Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी नोटीस करतात: पण तुम्हाला माहिती आहे का, स्त्रियांना अनेकदा पुरुषांच्या काही सवयी आवडत नाही. या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचे नाते बिघडू शकते. त्या सवयी कोणत्या, जाणून घेऊ या.

भावनिक नसणे

अनेकदा स्त्रिया भावनिक व्यक्तीच्या शोधात असतात. पुरुषांचे भावनिक नसणे स्त्रियांना आवडत नाही. स्रियांना नेहमी त्यांच्या भावना समजून घेणारा पार्टनर हवा असतो.

हेही वाचा : Jellyfish parenting : पालकांनो, मुलांना असे बनवा आत्मविश्वासू आणि जबाबदार, हा फॉर्म्युला १०० टक्के काम करणार, एकदा वाचाच…

जबाबदारी गंभीरतेने न घेणारा

स्त्रिया नेहमी जबाबदार पार्टनरच्या शोधात असतात. पुरुषांचे अधिक जबाबदार असणे स्त्रियांना खूप आवडते. स्त्रिया नेहमी जबाबदारीची जाणीव असणाऱ्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. जे पुरुष कोणतीही जबाबदारी गंभीरतेने घेत नाही, अशा पुरुषांपासून स्त्रिया दूर राहतात.

टॉक्सिक रिलेशनशिप

कोणतेही नाते प्रेम, विश्वास, काळजी आणि समजूतदारपणावर टिकून असतात. जेव्हा या गोष्टीची कमतरता भासते तेव्हा
टॉक्सिक रिलेशनशिप दिसून येते. नात्यात जर नकारात्मकता असेल तर नाते फार काळ टिकत नाही.

हेही वाचा : जया किशोरी सांगतात, “मैत्री कशी असावी?” जाणून घ्या, मित्र कसे असावेत? …

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोष देणे

काही पुरुषांना इतरांना दोष देण्याची सवय असते. असे पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. जर पुरुष कोणत्याही गोष्टीसाठी वारंवार पार्टनरला दोष देत असेल, तर स्त्रिया अशा पुरुषांपासून दूर राहतात..