तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अर्थात ऑफिसमध्ये घरानंतर जास्तीत जास्त वेळ घालवता. ही अशी जागा असते ज्यावर तुमची रोजी-रोटी अवलंबून असते. पण ऑफिसमध्ये सर्वांशी जुळवून घेत काम करणे अनेकदा कठीण असते. याचे कारण म्हणजे, सर्व लोक वेगवेगळ्या कुटुंबातील आणि वातावरणातून आलेले असतात. प्रत्येकाच्या विचारधारा वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या मतात आणि विचारात जमीन-आसमानाचा फरक असतो. म्हणूनच कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे, जेणेकरून परस्पर संबंध चांगले राहतात आणि सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात.

१) ऑफिसमधील बेसिक शिष्टाचारांचे पालन करा

ऑफिसमधील लोकांशी बोलताना थँक यू, सॉरी, एक्सक्यूज मी, पार्डन अशा शब्दांचा वापर करा, हे सर्व शब्द नक्कीच छोटे आहेत पण त्यांच्यात खूप पावर आहे. या शब्दांच्या वापरामुळे तुमच्या बोलण्यात एकप्रकारे नम्रता येते, यामुळे समोरची व्यक्तीही तुमच्याशी आदराने बोलते.

२) गप्पाटप्पा टाळा

कामाच्या ठिकाणी चांगेल काम करुन पैसा कमवणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. अशा पवित्र ठिकाणी असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागणार नाही. यामध्ये गॉसिपिंग किंवा इकडच्या गोष्टी तिकडे सांगण्याची चुकीची सवय मोडा. असे केल्याने तुम्ही सर्वांच्या नजरेतून उतराल. त्यामुळे तुमच्या कामाची काळजी घ्या आणि अशा गोष्टी करू नका.

३) सहकाऱ्यांना मदत करा

तुम्ही तुमच्या कामाशी संबंधित ठेवण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही इतरांपासून दूर रहावे. इतरांप्रती कृतज्ञ रहा आणि कोणाला तुमची गरज भासल्यास मागे हटू नका. तुम्हालाही कधीतरी कोणाच्या तरी मदतीची गरज भासू शकते, म्हणून नेहमी इतरांना गरजेवेळी मदत करा.

४) चांगले श्रोते बना

जास्त बोलू नका. आपल्याला पाहिजे तेवढेच बोला आणि इतरांचे ऐका. जेव्हा तुम्ही चांगले श्रोते असता आणि सर्वांचे ऐकल्यानंतर तुम्ही तुमचे मत अगदी कमी शब्दात सांगू शकता, तेव्हा तुमच्या शब्दांना महत्त्व दिले जाते आणि लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतात. तसेच कामाच्या ठिकाणीही तुमच्या शब्दांना महत्त्व दिले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) हसतमुखाने भेटा, गोड बोला आणि आदर करा

कामाच्या ठिकाणी अनेकदा तणावपूर्ण वातावरण असते. अशा परिस्थितीत मोठा आवाज बोलणे आणि एकमेकांवर रागवणे होतच असते. पण तुम्ही या वातावरणाचा भाग बनू नका. जेव्हाही तुम्ही ऑफिसमधील सहकाऱ्यांना भेटता तेव्हा हसतमुखाने आणि आदराने बोला. यामुळे तुमच्याशी बोलून लोक प्रभावित होतील.