World Cycle Day 2022 : नवीन सायकल घ्यायची म्हणजे ती कोणत्या कंपनीची घ्यायची, त्यावर किती पैसे खर्च करायचे, नक्की कोणत्या बाबी तपासायच्या असे मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. पण, या प्रश्नांच्या आधी एक साधा प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. तो म्हणजे, सायकलचा वापर नक्की कशासाठी करणार आहात? त्याचे एकदा उत्तर मिळाले की सायकल घेताना गरजेनुसार कोणत्या गोष्टी पडताळून पाहायच्या याचं उत्तर शोधणं सोप्प होईल.

नक्की वाचा >> सायकल संस्कृती… प्रदूषण, वाहतूक कोंडीच्या समस्यांनी ग्रासलेल्या मुंबईसारख्या शहरांसाठी ‘लाख दुखों की एक दवा’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी सायकलची विभागणी चार गटांत केली जायची. पुरुष, महिला, लहान मुले आणि महागडय़ा सायकल. पण गेल्या पाच-सहा वर्षांत रोड, हायब्रीड, माऊंटन, टूरींगसाठीच्या सायकल अशी सर्वसाधारण विभागणी पाहायला मिळते. प्रत्येक प्रकारच्या सायकलचा वापर, वैशिष्टय़े, ब्रॅन्डनुसार बलस्थानं वेगवेगळी आहेत. एकाच लेखात या सर्व गोष्टी समजावून सांगता येणार नाहीत. मात्र काही मूलभूत गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

> वापर, हौस आणि बजेट लक्षात घेऊनच सायकल विकत घ्या.

> सायकलिंगला नव्याने सुरुवात करणार असाल तर आधी साधी एका गिअरची आणि कमी किमतीची सायकल घ्या.

> नव्याने सुरुवात करणार असाल तर आधी सेकंडहॅन्ड घ्यायला देखील हरकत नाही.

> इंटरनेटवर सायकलींबाबत भरपूर माहिती उपलब्ध आहे ती जरूर वाचा.

नक्की वाचा >> पंक्चर किट ते स्पोक पाना… सायकलच्या टूल किटमध्ये या १५ गोष्टी असायलाच हव्यात

> खरेदीपूर्वी दुकानदारासोबत तुमची सायकलची गरज, त्याच्याकडील वेगवेगळे ब्रॅन्ड आणि किमतींबाबत चर्चा करा.

> तुमची उंची आणि वजनाला अनुसरून सायकल निवडा.

> तुम्हाला आवडलेल्या सायकली चालवून बघा.

> गियर असणारी सायकल घेणार असाल तर तुमच्या वापरानुसार कोणत्या प्रकारची सायकल हवी आहे याचा निर्णय आधी घ्या.

> आपण निवडलेल्या सायकलच्या प्रत्येक भागाची माहिती जाणून घ्या आणि हळूहळू दुरूस्तीचंही काम शिकून घ्या.

> सायकलसोबत हेल्मेट जरूर विकत घ्या. चांगले हेल्मेट थोडे महाग असते, पण नियमित वापर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

> रात्री सायकल चालवणार असाल तर रेफ्लेक्टर्स नक्की वापरा. हेडलाईट आणि टेललाईटपेक्षा ते स्वस्त असतात. बजेटनुसार यापैकी एखादी गोष्ट जरूर विकत घ्या.

> परदेशी ब्रॅण्डच्या सायकल विकत घेताना अनेक अॅक्सेसरीज घेण्याचा मोह होतो. कारण बहुतांशी परदेशी बनावटीच्या सायकलींना साईड स्टॅड, घंटी, कॅरीयर आणि अगदी मडगार्ड पण नसते. तसेच हॅन्ड ग्लोव्ज, पॅडेड शॉर्टस, सनग्लासेस, पंप, लॉक अशी ही यादी वाढतच जाते. परंतु, तुमच्या गरजेनुसारच त्यांची खरेदी करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World bicycle day 2022 easy 11 step bicycle buying guide india scsg
First published on: 03-06-2022 at 11:33 IST