जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास, मोठय़ा आतडय़ाचा तिसरा क्रमांक लागतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: पाश्चात्त्य देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्या मानाने आशिया, आफ्रिका खंडामध्ये कमी आहे. परंतु हल्ली ज्या ज्या देशामध्ये पाश्चात्त्य देशांप्रमाणे राहणीमान व खाणेपिणे बदलले आहे, त्या देशामध्ये मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे प्रमाणसुद्धा वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्नपचन संस्थेच्या सर्वात शेवटचा नळीसारखा अवयव. ज्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला कचरा किंवा मल साठवलेला असतो. मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग हा आतडय़ाच्या आतील आवरणांपासून सुरू होतो व तेथून पुढे पसरतो. अनेकदा मोठय़ा आतडय़ामध्ये छोटय़ा छोटय़ा गाठी आढळून येतात. हे पॉलिप्स (Polyps) सुरुवातीस कर्करोगाचे नसतात. परंतु अनेक वर्षे तसेच आतडय़ामध्ये राहिल्यास त्याचे परिवर्तन कर्करोगामध्ये होऊ शकते, म्हणून अनेकदा सर्जन्स कोलोनोस्कोपी (Surgeons – Colonoscopy दुर्बिणीचा तपास) करताना हे पॉलिप्स आढळल्यास काढून टाकतात असे पॉलिप्स काढून ते तपासणीस पाठवून त्यात कर्करोग आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाते. हा कर्करोग जरी संसर्गजन्य नसला तरी आनुवंशिक वा खानदानी आहे. म्हणजेच एखाद्या कुटुंबात हा आजार झाला तर त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना (भावंडे, मुले) हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cancer day 2019 colon cancer causes treatment symptoms
First published on: 04-02-2019 at 09:45 IST