लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना या प्राण्याबद्दल विशेष आत्मीयता वाटते. लहानपणी शिकवल्या जाणाऱ्या चित्रांमध्येसुद्धा पिढ्यान् पिढ्या हत्तीचे कार्टून काढले जाते आहे. आपल्या सणांमध्ये, संस्कृतीमध्ये, आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या आख्यायिकेमध्येही हत्तीला विशेष स्थान आहे. पूर्वजांनी तर रानटी हत्तींवर पाळीव प्राण्यांचे संस्कार करून लढाईमध्ये हत्तींना वापरले होते.जगात सध्या आफ्रिकन आणि आशियाई हे हत्तींचे दोन प्रमुख प्रकार बघायला मिळतात. सर्वाधिक हत्ती हे आफ्रिकेत असून शंभर वर्षांपूर्वी त्यांची संख्या तीस लाखांहून अधिक असल्याचे संदर्भ सापडतात.

शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे. माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे,वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य हिस्सा असल्याचे लक्षात येते.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

नक्की पाहा हे फोटो >> १३०० किमीचा प्रवास… १४ ड्रोन्स, ५०० कर्मचारी त्या १४ हत्तींवर सतत होते लक्ष ठेऊन; कारण वाचून थक्क व्हाल

दिवसाचा इतिहास

दरम्यान २०११ मध्ये जेव्हा जागतिक हत्ती दिवस साजरा करण्याची कल्पना कॅनेडियन चित्रपट निर्माते सुश्री पॅट्रिशिया सिम्स आणि कॅनाझवेस्ट पिक्चर्सचे मिशेल मायकल क्लार्क आणि थायलंडचे हत्ती पुनर्जन्म फाउंडेशनचे महासचिव शिवपॉर्न दरदारानंद यांनी केली होती. त्यानंतर हत्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी सुश्री सिम्स आणि एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशनने १२ ऑगस्ट २०१२ रोजी औपचारिकपणे जागतिक हत्ती दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. १२ ऑगस्ट २०१२ पासून, सुश्री सिम्स फाउंडेशनने जागतिक हत्ती दिनाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन केल्याने तब्बल ६५ वन्यजीव संघटना आणि जगभरातील अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दिला.

दिवसाचा उद्देश

हत्ती दंतांचे अवैधपणे शिकार करून त्यांच्या दातांचा व्यापार रोखण्यासाठी त्यांच्यावर अंमलबजावणी धोरणांमध्ये सुधारणा करून हत्तींचे संरक्षण करण्यासाठी आणि विविध संवर्धन करणे. तसेच बंदिवास आणि काही बंदिवान हत्तींना अभयारण्यात परत आणणे. याकरिता या धोरणांना पाठिंबा देण्यासाठी भाग धारकांचे लक्ष वेधणे आणि या सर्व गोष्टींना आळा बसवा म्हणून हा या दिवसाचा उद्देश आहे.

६०% हत्ती भारतात

१२ ऑगस्टला जगभरात हत्तींचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ‘जागतिक हत्ती दिन’  साजरा केला जातो. हत्तींचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजनांचे आदानप्रदान व्हावे या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो. निसर्ग संवर्धनविषयक आंतरराष्ट्रीय महासंघ, IUCN च्या लाल यादीत म्हणजेच धोकादायक स्थितीत असलेल्या प्राण्यांच्या यादीत आशियाई हत्तींचा समावेश करण्यात आला आहे. भारत वगळता आशियातील अनेक देशात, हत्तींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सध्या जगात ५०००० ते ६०००० आशियाई हत्ती असून, त्यापैकी ६० टक्के हत्ती भारतात आहेत. भारतासाठी हत्ती हा नैसर्गिक वारसा प्राणी असून या दिवशी हत्तींच्या संवर्धन जनजागृती केली जाते.