World Iodine Deficiency Day: आयोडीनचे इतर स्त्रोत आणि कमतरतेमुळे होणारे नुकसान जाणून घ्या

आयोडीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक आहे.

lifestyle
सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात. (photo: pexels)

आयोडीन हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक आहे. जे शरीरात थायरॉक्सिन उत्पादनासाठी आवश्यक आहे. तसेच थायरॉक्सिन हृदयाच्या कार्यापासून पचन, बुद्धिमत्ता आणि वाढीपर्यंत सर्व कार्ये प्रभावित करते. त्यामुळे त्याची पातळी सामान्य राहण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात आयोडीन वापरणे आवश्यक आहे.

आयोडीनच्या कमतरतेच्या समस्या

चेहऱ्यावर सूज येणे

बौनेपणा (उंची न वाढणे.)

पाहण्यात, ऐकण्यात आणि बोलण्यात त्रास होतो

स्नायुंचे आखडणे

मानसिक विकार

थायरॉईड ग्रंथीची वाढ आणि सूज

गर्भपात होणे

मेंदूचे कार्य बिघडणे

कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे

नवजात बाळाचे वजन कमी होणे

लहान मुलांचे शारीरिक विकास योग्य पद्धतीने न होणे

मीठ व्यतिरिक्त आयोडीनचे स्त्रोत

आयोडीनचा मुख्य आणि सोपा स्त्रोत मीठ आहे, पण जास्त प्रमाणात मीठ वापरल्याने इतर अनेक आजार होऊ शकतात, त्यामुळे आयोडीनच्या पुरवठ्यासाठी मीठावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे आहारात मुळा, शतावरी (शतावरी रेसमोसस), पालक, बटाटे, मटार, गाजर, टोमॅटो, काकडी, कांदे, केळी, स्ट्रॉबेरी, अंड्यातील पिवळ बलक, दूध, चीज आणि कॉड-लिव्हर तेल यांचा समावेश करा. याशिवाय बटाटे, दूध, मनुके, दही, ब्राऊन राईस, लसूण, मशरूम हे देखील आयोडीनचे चांगले स्रोत आहेत.

आरोग्यासाठी सर्वोत्तम मीठ कोणते?

सैंधव मीठ

सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात. हे मीठ नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त सैंधव मीठामध्ये कमी खारटपणा आणि आयोडीनचे प्रमाण कमी असते, यामुळे उच्च रक्तदाब आणि डोळ्यांच्या सूजची समस्या नियंत्रित होते. तसेच सामान्यतः घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मीठापेक्षा त्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हा मीठ आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

आयोडीनच्या अतिसेवनाने होणारे नुकसान

सामान्य मीठ किंवा सैंधव मीठात देखील आयोडीनची महत्त्वपूर्ण मात्रा असते. ज्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने कोणत्याही प्रकारे शारीरिक नुकसान होत नाही, परंतु ते जास्त प्रमाणात घेतल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या हाडांवर होतो, जे हळूहळू कमकुवत होऊ लागतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World iodine deficiency day other sources of iodine other than salt and the disadvantages of its deficiency scsm

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी