दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी अवयव दानाचे महत्त्व संबोधित करण्यासाठी आणि अवयव दान करण्याशी संबंधित मिथकांना दूर करण्यासाठी ‘जागतिक अवयव दान दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून अधिक जीव वाचतील. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुसे इत्यादी अवयव दान केल्याने दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांचे प्राण वाचू शकतात. निरोगी अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे असंख्य लोक आपले प्राण गमावतात जे अवयव दानामुळे वाचू शकतात. या दिवसाचे उद्दीष्ट लोकांना हे समजण्यास मदत करणे आहे की मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान करण्यासाठी स्वयंसेवा करणे अनेकांसाठी जीवन बदलणारे असू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिले अवयव दान आणि नोबेल पारितोषिक

आधुनिक औषधाने लक्षणीय विकास केला आहे आणि यामुळे अवयव एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे तसेच निरोगी जीवन जगण्यास सक्षम केले आहे. पहिले यशस्वी जिवंत दाता अवयव प्रत्यारोपण अमेरिकेत १९५४ मध्ये करण्यात आले. रोनाल्ड आणि रिचर्ड हेरिक या जुळ्या भावांमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल डॉक्टर जोसेफ मरे यांना १९९० मध्ये शरीरविज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World organ donation day 2021 history and significance of this day ttg
First published on: 13-08-2021 at 12:11 IST