‘शाओमी’च्या Redmi 8 या बजेट स्मार्टफोनसाठी आता MIUI 12 अपडेट रोलआउट होण्यास सुरूवात झाली आहे. कंपनीने रेडमी 8 साठी MIUI 12 अपडेट जारी केलं आहे. ट्विटरवर अनेक युजर्सनी रेडमी 8 साठी MIUI 12 अपडेट मिळाल्याची माहिती दिली आहे. अपडेटसोबतच कंट्रोल सेंटरमध्ये बदल आणि डार्क मोड यांसारखे फिचर्स मिळत आहेत. Redmi 8 स्मार्टफोनसाठी MIUI 12 अपडेट व्हर्जन V12.0.1.0.QCNMIXM असून याची साइज जवळपास 649MB आहे.

जर तुमच्याकडेही Redmi 8 फोन असेल आणि अपडेट मिळालं असेल तर आधी डाटा बॅकअप घ्या आणि चांगल्या वाय-फाय कनेक्शनवर अपडेट करा. जर अपडेट मिळालं नसेल तर फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन अपडेट चेक करु शकतात. सोशल मीडियावर शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, अपडेटनंतर Redmi 8 युजर्सना नवीन कंट्रोल सेंटर मिळेल. याशिवाय होम स्क्रीनमध्येही काही बदल करण्यात आले असून बग फिक्स करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने हा फोन लाँच केला होता. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स यामध्ये आहेत.

रेडमी 8 डिस्प्ले फीचर्स आणि किंमत :
या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Splash-Proof कॉटिंगसह उपलब्ध करण्यात आला असून डिस्प्लेवर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. यात तुम्ही ड्युअल सीमकार्डशिवाय मायक्रो एसडी कार्डचा वापर करु शकतात. सफायर ब्ल्यू , रुबी रेड आणि ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल Sony IMX363 प्रायमरी सेंसर आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल Portrait लेंस देखील आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात गुगल लेंस फीचर आहे. 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी यामध्ये असून 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. रेडमी 8 च्या 4 जीबी रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे