Benifits of Lichi : सध्या बाजारात लिची मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. लिची फळ सर्वांना खायला आवडत. लिची चवीनेही भरपूर असण्यासोबतच त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. लिची या फळासोबतच याची साल देखील अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही लिचीच्या सालीचा विशिष्ट पद्धतीने अवलंब करून अनेक समस्यांवर मात करू शकता. जाणून घेऊया या पद्धतींबद्दल…
लिचीचे फायदे
लिची चवीने भरपूर असे फळ आहे. लिचीचे सेवन केल्याने व्यक्ती ताजीतवानी राहते. लिचिमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आढळतात जे लठ्ठपणा कमी करू शकतात आणि पचनसंस्था मजबूत करू शकतात तसेच घसादुखीपासून आराम मिळवू शकतात. पण तुम्हाला माहित नसेल की फक्त लिचीच नाही तर लिचीची साल देखील आरोग्यसाठी खूप उपयुक्त आहे. तर जाणून घेऊया लिचीच्या सालीचा वापर करून कोणत्या समस्यांवर मात करता येते आणि लिचीच्या सालीचा वापर कसा करावा.
लिचीच्या सालीचा वापर
१. लिचीची साल तुम्ही स्क्रब म्हणून वापरू शकता. हा स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल, गुलाबपाणी आणि लिचीच्या सालीची पावडर लागेल. हे मिश्रण एकत्र करून हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. या स्क्रबचा वापर केल्याने केवळ मृत पेशीच निघत नाहीत तर चेहराही चमकदार होऊ शकतो.
२. घोट्यावरची घाण साफ करण्यासाठी लिचीची साल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. यासाठी साल बारीक वाटून घ्या आणि त्यात बेकिंग सोडा, सफरचंद व्हिनेगर आणि मुलतानी माती मिक्स करा, आता बनवलेली पेस्ट २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर पाण्याने घोटे स्वच्छ धुवा .
३. जर तुमच्या मानेवर काळे डाग असतील तर लिचीच्या सालीने ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी लिचीच्या सालीची पावडर तयार करा आणि त्यात लिंबाचा रस, खोबरेल तेल, हळद आणि बेकिंग पावडर मिसळा. आता बनवलेले मिश्रण मानेवरील काळ्या भागावर लावा, असे केल्याने समस्या दूर होईल.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आवशक्यता असल्यास नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)