Baby Recipes: पालकांना अनेकदा त्यांच्या लहान बाळाच्या बारीकपणाबद्दल काळजी असते. आपली मुलं नेहमी हेल्दी आणि निरोगी असावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. विशेषत: नुकतेच चालायला शिकलेल्या मुलांच्या जेवणाबाबत पालक टेन्शनमध्ये असतात. जर तुम्हालाही तुमच्या मुलाच्या पातळपणाचा त्रास होत असेल आणि मुलाचे वजन थोडे वाढावे असे वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या आहारात काही बदल करू शकता. ज्यामुळे तुमच्या मुलांचे वजनही वाढेल आणि तुमची मुलं निरोगीही राहतील. तर जाणून घ्या अशा काही पाककृती आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाचे वजन वाढवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) उपमा

बाळाचे वजन वाढवण्यासाठी तुम्ही उपमा बनवू शकता. तुमच्या मुलांनाही त्याची चव आवडेल. जेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा तुम्ही ते लगेच तयार करू शकता. उपमा बनवण्यासाठी तुम्ही रवा हलका तळून घ्या आणि नंतर त्यात थोडे मीठ आणि पाणी घाला, चांगले उकळू द्या आणि नंतर त्यात एक चमचा तूप घाला. पूर्णपणे थंड झाल्यावर बाळाला खायला द्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भाज्याही घालू शकता, पण त्यासाठी भाज्यांची चांगली प्युरी करा. जर मुल मोठे असेल आणि भाज्या चघळू शकत असेल तर तुम्ही भाज्या उकळून त्यात घालू शकता.

( हे ही वाचा: बीटरूट लाडू आरोग्यासाठी आहेत फायदेशीर; जाणून घ्या कृती)

२) साबुदाणा खिचडी

साबुदाणा लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही हे बाळालाही खाऊ घालू शकता. हे बनवण्यासाठी तुम्ही साबुदाणा भिजवा आणि नंतर एका पातेल्यात पाणी गरम केल्यानंतर त्यात भिजवलेला साबुदाणा टाका. गॅस चालू ठेवा.मग त्यात मीठ किंवा साखर घाला, हे तुमच्या मुलाच्या चवीवर अवलंबून आहे की त्याला गोड खाण्याची आवड आहे की खारट. नंतर त्यात तूप घाला. बाळाला पूर्णपणे थंड झाल्यावरच खायला द्या. याने तुमच्या बाळाचे वजन नक्की वाढेल.

३) केळी शेक

बहुतेक मुलांना केळी खायला आवडत नाही, म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी चविष्ट केळी शेक बनवू शकता. तुमची मुलं जर केळी खात नसतील, तर त्यांना हा केळी शेक प्यायला नक्की आवडेल. तसंच याने वजनही झपाट्याने वाढेल. हा शेक करण्यासाठी ब्लेंडरमध्ये केळी, दूध आणि साखर घालून जाडसर शेक तयार करा. शेक बनल्यानंतर तुम्ही हा तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता. त्यांना तो नक्की आवडेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can feed your baby these 3 things to gain weight bones will be strong gps
First published on: 22-07-2022 at 20:06 IST