- ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल!’ अशी म्हण आहे. पचनाच्या सर्व तक्रारींवर ओवा उत्तम गुणकारी आहे. पावसाळा हा पोटाच्या तक्रारींचा व वात विकाारांचा असल्यामुळे हा ऋतू संपेपर्यंत पाचक औषधांची माहिती घेऊ.
- अर्धा चमचा ओवा + चिमुटभर सैंधव रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावा. त्यामुळे अपचन, संडासला साफ न होणे, पोट दुखणे, सतत पोट फुगणे या तक्रारी जातात.
- लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ‘ओवा अर्क’ कोमट पाण्याबरोबर पोटात द्यावाच, पण बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे. पोटदुखी लगेच थांबते. कृतीजंतही कमी होतात.
- जेवल्यावर पोटात जळजळत असेल तर ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध यांची सुपारी चावून खावी.
- जेवल्यावर पोटात जळजळत असेल तर ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध यांची सुपारी चावून खावी.
- दूध पचत नसेल तर, दूध प्यायल्यावर चिमूटभर ओवा चावून खावा किंवाा बऱ्याच जणांना गहू पचत नाही, अशांनी कणकेत थोडी ओव्याची पावडर घालून पोळी खावी. गहू पचेल.
- लघवीला फार वेळा होत असल्यास गूळ व ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन वाटाण्याएवढय़ा गोळय़ा करून चार-चार तासांनी खाव्यात. रात्री अंथरूणात लघवी करणाऱ्या मुलांनाही हरभऱ्याच्या डाळीएवढी ओवा गुळाची गोळी रात्री झाोपताना खायला द्यावी.
- ओवा नेहमी थोडासाच चावून पाण्याबरोबर गिळावा, अन्यथा तोंड येते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2016 रोजी प्रकाशित
आयुर्मात्रा : ओवा
जेवल्यावर पोटात जळजळत असेल तर ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध यांची सुपारी चावून खावी.
Written by वैद्य राजीव कानिटकर

First published on: 11-06-2016 at 05:11 IST
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta health advised