लोकप्रिय वारसास्थळांना आजकाल पर्यटकांचा प्रचंड ओघ असतो. पण अनेकवेळा या स्थळांजवळच फारसे माहीत नसलेले ठिकाण असते. वारसास्थळांच्या यादीत त्याचा समावेश नसेलही पण जरा वाकडी वाट करुन हे पाहणं नक्कीच लाभदायक ठरु शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादला अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. याच अजिंठय़ाला वाटेवर एक अद्वितीय मंदिर वसले आहे ते म्हणजे अन्व्याचे मंदिर. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मूळचे लक्ष्मीचे मंदिर असावे. मंदिराला अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह असून दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाह्य़भागावर विष्णूच्या चोवीस शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्य अशी चार आयुधे असतात.   भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द येतो आणि त्याचा अर्थ सुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तीशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरुपातील प्रतिमा दाखवली जाते. विष्णूच्या शक्तींचे मूर्तीरुपातील दर्शन  या मंदिरावर पाहायला मिळते.

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on lord vishnu temple in anva village at aurangabad
First published on: 06-01-2016 at 03:00 IST