मेष या आठवडय़ाचे ग्रहमान तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय देणारे आहे. त्याचा ताबडतोब फायदा उठवा. व्यापार-उद्योगात थोडे पसे हाताशी असल्यामुळे तुम्ही एखादे धाडस करायला प्रवृत्त व्हाल. हितचिंतकांकडून तुम्हाला साथ मिळेल. जोडधंद्यातून कमाई होईल. नोकरीमध्ये एखाद्या कामानिमित्त संस्थेतर्फे विशेष सवलत बहाल केली जाईल. वरिष्ठ आणि सहकारी त्यांच्या स्वार्थापोटी तुम्हाला मदत करायला तयार होतील. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ एखादा प्रश्न बराच काळ लांबत आलेला असेल तर आता त्यावरती तोडगा शोधून काढण्याकरिता तुम्ही हालचाल करायला सुरुवात कराल. व्यापार-उद्योगात एखादे मोठे काम मिळविण्याकरिता तुम्ही निकराने प्रयत्न कराल, पण कदाचित ते एकटय़ाने शक्य नसल्यामुळे मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. भागीदारी किंवा मत्रीकराराचे नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे येतील. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ नवीन कामाची नांदी करून देतील. त्यामुळे कदाचित त्यांचे विचारचक्र बदलण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astro
First published on: 24-04-2015 at 01:04 IST