24 September 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ११ ते १७ सप्टेंबर २०२०

चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे उमेद आणि उत्साह टिकवून धराल.

संग्रहित छायाचित्र

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे उमेद आणि उत्साह टिकवून धराल. आपली ऊर्जा योग्य ठिकाणी उपयोगात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मेहनतीचे फळ उशिराने मिळेल. सहकारी वर्ग आपल्या कल्पना पणाला लावेल. जोडीदार कौटुंबिक जबाबदाऱ्या निगुतीने पार पाडेल. एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा ठरेल. घरातील वातावरण आनंदी ठेवाल. पाठ आणि पोटाचे आरोग्य जपा. मानसिक तणावामुळे पचन बिघडू देऊ नका.

वृषभ चंद्र-बुधाच्या लाभयोगामुळे भावना आणि व्यवहार यांत समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात अधिक अभ्यासपूर्वक सादरीकरण करण्याची जरुरी भासेल. मेहनतीनेच स्वत:ला सिद्ध कराल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाच्या समस्या सोडवण्यात यश येईल. जोडीदार आपल्या विचारात गर्क असेल. त्याला त्याचा थोडा मोकळा वेळ देणे गरजेचे आहे. मतभिन्नता असल्यास आत्ता त्यावर चर्चा करणे योग्य ठरणार नाही. घरात ज्येष्ठ मंडळींचा धाक राहील.

मिथुन चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे आपल्यातील विशेष गुणांचा चांगल्या प्रकारे उपयोग कराल. लोकहितार्थ कामांमध्ये सहभागी व्हाल. नव्या समस्या सोडवताना बुद्धिचातुर्य उपयोगी पडेल. सहकारी वर्ग  विचारांना वेगळी दिशा देईल. गोंधळून न जाता आपले विचार ठामपणे मांडाल. जोडीदाराला आपल्या आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. तापाची कणकण व डोकेदुखीचा त्रास होईल.

कर्क चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे चंद्राचे मनोबल आणि मंगळाचा उत्साह यांची एकमेकांना जोड मिळेल. हाती घेतलेल्या कामांना गती येईल. नोकरी-व्यवसायात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागेल. संकटाला संधी मानून नव्या वाटेने प्रवास सुरू कराल. जुन्या ओळखी, सहकारी वर्ग पाठीशी उभा राहील. जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावताना कष्टाची परिसीमा गाठेल. मित्रमंडळी आपली साथ देतील. यकृताचे आरोग्य सांभाळावे.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे वेगळ्या कार्यक्षेत्रात पदार्पण करण्याचा विचार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मते स्वीकारून पुढे जाणे कठीण जाईल. विचारप्रवाहातील तफावतीमुळे मानसिक तणाव वाढेल. सहकारी वर्गाच्या स्पष्टवक्तेपणामुळे काही प्रश्न निकालात निघतील. जोडीदाराशी मनमोकळी चर्चा करणे आवश्यक! कौटुंबिक कलह वाढू देऊ नका. रक्तातील घटकांचे प्रमाण वर-खाली होईल. योग्य आहार व व्यायाम करणे आवश्यक!

कन्या चंद्र-शुक्राच्या युतीयोगामुळे  कल्पक आखणी आणि उत्तम नियोजन कराल. तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या निर्णयांचे काटेकोरपणे पालन कराल. सहकारी वर्गाच्या नव्या कल्पनांचा जरूर विचार करावा. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडचणींवर मात करताना त्याची वैचारिक दमणूक होईल. कौटुंबिक वातावरण सामाजिक कार्याला पोषक असेल. गरजूंना योग्य मार्गदर्शन कराल. पचनाच्या तक्रारी बळावतील. नेमाने व्यायाम  करा.

तूळ रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे हाती घेतलेल्या कामांना गती येईल. मनात योजलेल्या गोष्टी प्रत्यक्षात साकाराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. अधिकाराचा उपयोग योग्य रीतीने कराल.  कार्यक्षेत्रात नवे करार होतील. आस्थापनेच्या फायद्याचे निर्णय अचूकतेने घ्याल. जोडीदाराचे स्वास्थ्य बिघडेल. त्याला आपल्या आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरणातील तणावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे! मान आणि खांदे दुखणे दुर्लक्षित करू नका.

वृश्चिक चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे ओळखीतून वैयक्तिक कामे पुढे सरकतील. आर्थिक बाजू सावरून धराल. नवे अधिकार हाती येतील. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाच्या समस्या समजून त्यांना मदत कराल. जोडीदारासह सूर जुळवून घ्यावे लागतील. एकमेकांची मते जाणून घेणे गरजेचे ! कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. ज्येष्ठांच्या मदतीने नातेवाईकांना आधार द्याल. अपचन आणि पित्त यांचा त्रास सहन करावा लागेल.

धनू रवी-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे आंतरिक बळ वाढेल. ज्येष्ठ, अनुभवी लोकांकडून प्रेरणा घ्याल. नोकरी-व्यवसायात बुद्धिचातुर्य आणि अधिकार यांचा योग्य उपयोग कराल. सहकारी वर्गापुढील पेच विचारपूर्वक हाताळाल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात बरीच उलथापालथ होईल. आपण त्याचा आधार बनाल. कौटुंबिक वातावरण ज्येष्ठांमुळे संतुलित राहील. दमणूक जास्त होईल. विश्रांती आवश्यक!

मकर चंद्र-शनीच्या समसप्तम योगामुळे चंद्राच्या चंचलतेला शनीच्या शिस्तीचा लगाम बसेल. मेहनतीची जोड मिळाल्याने कामांना गती येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. नव्या संशोधनाला पुष्टी मिळाल्याने मोलाची कामगिरी पार पाडाल. सहकारी वर्ग मदत करण्यास नाखुशी दाखवतील. परिस्थिती सांभाळून घ्यावी लागेल. जोडीदाराशी चांगला सूर जुळेल. त्याचा सल्ला उपयोगी ठरेल. त्वचाविकार आणि अपचन यावर वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

कुंभ चंद्र-गुरूच्या समसप्तम योगामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. ज्येष्ठ व्यक्तींचे पाठबळ मिळेल. ज्ञानाचा उपयोग करून इतरांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात नवे करार लाभदायक ठरतील. कामानिमित्त लहानमोठे प्रवास कराल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांचे साहाय्य मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात उच्च अधिकार मिळतील. कामाचा योग्य मोबदला त्याला मिळेल. मूत्रविकार सतावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मीन बुध-गुरूच्या केंद्रयोगामुळे ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग चांगल्या प्रकारे कराल. नोकरी-व्यवसायात नित्याच्या गोष्टींमध्ये थोडेफार बदल करून नावीन्य आणण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाची मेहनत आणि चिकाटी यामुळे कामाला गती येईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात काही नव्या संकल्पना मांडेल. त्याच्या व्यवहारचातुर्यामुळे कुटुंब सदस्यांसाठी लाभदायक ठरतील असे निर्णय घ्याल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 6:07 am

Web Title: astrology from 11th to 17th september 2020
Next Stories
1 राशिभविष्य : दि. ४ ते १० सप्टेंबर २०२०
2 राशिभविष्य : दि. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२०
3 राशिभविष्य : दि. २१ ते २७ ऑगस्ट २०२०
Just Now!
X