सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष : गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे गरजूंना मदत कराल. समाजसेवेत सहभागी व्हाल. आपल्या ओळखींमुळे होतकरू व्यक्तींची गाडी रुळावर आणाल. नोकरी-व्यवसायात भरपूर मेहनत घेऊन कामाला गती द्याल. आपली पत, प्रतिष्ठा सांभाळाल. सहकारी वर्गाला त्यांची मते स्पष्टपणे मांडण्याची संधी द्याल. जोडीदार आíथक बाजू सांभाळण्याचा यशस्वी प्रयत्न करेल. नातेवाईकांना आपला आधार वाटेल. फुप्फुसे आणि त्वचा यांचे आरोग्य सांभाळा.

वृषभ  : चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे आरोग्य सुधारेल. उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात धडाडी दाखवाल. अतिरिक्त कामाची जबाबदारी स्वीकाराल. सहकारी वर्गाला योग्य प्रशिक्षण द्याल. वरिष्ठांचे मत मान्य करून कामात आगेकूच कराल. जोडीदाराच्या कार्यात त्याला यश मिळेल. आíथक बाजू सावरून धराल. खोटय़ा आश्वासनांना बळी पडू नका. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीची चिंता सतावत राहील. वैद्यकीय उपायांसह त्यांना भावनिक आधारही द्यावा लागेल.

मिथुन : चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे परिस्थितीवर मात करून नवे मार्ग शोधाल. स्फूíतदायक लेखन कराल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाला उत्तेजन द्याल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. आपल्या नव्या योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. जोडीदाराचे सद्य:परिस्थिती स्वीकारणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक पातळीवर मोठय़ा बदलांना सामोरे जावे लागेल. शेजाऱ्यांच्या मदतीला हिरिरीने धावून जाल. पित्तामुळे पचन आणि उत्सर्जनाच्या तक्रारी वाढतील.

कर्क : चंद्र-शनीच्या प्रतियोगामुळे अडचणींची मालिका सर करत मार्गक्रमणा करावी लागेल. वरिष्ठांशी मतभेद झाले तरी शब्दांवर ताबा ठेवा. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. कामातील आरेखनाचा भाग आणि कलात्मक सादरीकरणाचा भाग आपण चोखपणे पार पाडाल. जोडीदाराची निराश, हताश स्थिती समजून घ्याल. आपला भावनिक आधार त्याला उत्तेजन देऊ शकेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

सिंह : चंद्र आणि नेपच्यून या भावनाशील ग्रहांच्या नवपंचम योगामुळे आपल्यात वाढलेल्या सकारात्मकतेचा उपयोग नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी होईल. सहकारी वर्गाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने उत्तम मार्गदर्शन कराल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. जोडीदाराच्या समस्या हळूहळू सोडवाल. तात्त्विक पेच सुटतील. कुटुंब सदस्यांच्या आरोग्याची चिंता भेडसावेल. सर्दी-पडसे आणि डोकेदुखी यावर त्वरित उपचार घ्यावेत.

कन्या : भाग्यस्थानातील चंद्र-शुक्राच्या युतीयोगामुळे हाती घेतलेले काम नीटनेटके आणि आखीवपणे कराल. लोकांच्या पसंतीस उतरेल. नोकरी-व्यवसायात चतुराईने आपल्या कामाचे सादरीकरण कराल. सहकारी वर्गाची नाराजी जाऊन सहमती मिळवाल. ज्येष्ठ वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. जोडीदार आपले विचार ठामपणे मांडेल. त्याच्या कामाच्या ठिकाणी आपला प्रभाव पाडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नातेवाईकांकडून आनंदवार्ता समजतील.

तूळ : चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे कामातील उत्साह वाढेल. परिस्थितीशी जुळवून घेऊन पुढे मार्गक्रमण कराल. नोकरी-व्यवसायात नवे विचार मांडू नका. त्यांची दखल घेतली जाणार नाही. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचा मोलाचा वाटा असेल. त्याची बुद्धिमत्ता आणि धाडस यांचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव कमी करण्याची जबाबदारी आपण घ्याल. पचनसंस्थेवर जोर पडेल. पित्ताचा त्रास संभवतो.

वृश्चिक : रवी आणि शनी या शत्रू ग्रहांच्या प्रतियोगामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळवाल. मोठय़ांचे मार्गदर्शन कामी येईल. सहकारी वर्गाच्या समस्या वरिष्ठांपुढे मांडाल. कठीण प्रसंगामुळे मत्रीचे धागे अधिक घट्ट जुळतील. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील. जोडीदाराचा भक्कम आधार मिळेल. एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे. लहानसहान गोष्टींचा डोक्याला ताप करून घेऊ नका. अचानक पोटदुखी वाढेल.

धनू : चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे धाडसी निर्णय घ्यायला पुढे सरसावाल. परंतु कृती विचारपूर्वकच करावी. नोकरी-व्यवसायात शब्द जपून वापरा. अन्यथा वरिष्ठ किंवा सहकारी वर्ग दुखावले जाण्याची शक्यता आहे. कामात मेहनतीसह चतुराई आवश्यक आहे. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. कुटुंब सदस्यांचे आरोग्य जपावे. कौटुंबिक वातावरण धावपळीचे जाईल. व्यायाम व आहार यांकडे दुर्लक्ष केल्यास अनारोग्य येईल. मूत्रविकार सतावतील.

मकर : चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे कला व साहित्याचा आस्वाद घ्याल. मनोरंजनाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकाल. नोकरी-व्यवसायात इतरांना आधार द्याल. अनुभवातून शहाणपण शिकायला मिळेल. सहकारी वर्ग योग्य साथ देईल. त्यांच्या सहकार्यामुळे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी दाखवाल. जोडीदाराच्या कामाला योग्य पोचपावती मिळेल. कुटुंबात जिव्हाळ्यासह शिस्तीलाही अधिक महत्त्व द्याल. खांदे दुखणे वा आखडणे दुर्लक्षित करू नका.

कुंभ : बुध आणि हर्षल या बौद्धिक ग्रहांच्या लाभ योगामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि विचारांचा प्रसार कराल. विरोधकांच्या टीकांना सामोरे जावे लागेल. नोकरी-व्यवसायात संशोधन क्षेत्रात भरीव योगदान कराल. आíथक बाजू स्थिरावेल. सहकारी वर्गाकडून झालेली दिरंगाई आपण खपवून घेणार नाही. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अडचणीतून मार्ग काढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. छाती, बरगडय़ा आणि उदरपोकळी यांचे दुखणे संभवते.

मीन : चतुर्थ स्थानातील चंद्र-बुधाच्या युती योगामुळे भावनांपेक्षाही व्यवहाराला अधिक महत्त्व द्याल. बुद्धिचातुर्याची चुणूक दाखवाल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. सहकारी वर्गाकडून लहानमोठय़ा चुका होतील. जोडीदाराच्या मनाप्रमाणे वागणे काहीसे कठीण जाईल. अनेक तडजोडी कराव्या लागतील. कौटुंबिक सुख टिकवण्यासाठी वैयक्तिक सुखाकडे दुर्लक्ष कराल.