19 November 2019

News Flash

चित्र

कोल्हापूरच्या कलासंपन्न भूमीतील आणखी एक प्रसिद्ध चित्रकार म्हणजे अनंत मल्हार माळी. सुरुवातीला पुण्यात चित्रशाळा प्रेसमध्ये काम केल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी प्रसिद्ध चित्रकार ए.

| July 4, 2014 01:01 am


कोल्हापूरच्या कलासंपन्न भूमीतील आणखी एक प्रसिद्ध चित्रकार म्हणजे अनंत मल्हार माळी. सुरुवातीला पुण्यात चित्रशाळा प्रेसमध्ये काम केल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी प्रसिद्ध चित्रकार ए. एच. मुल्लर यांच्यासह चित्रकलेचा वर्ग सुरू केला. ‘मनोरंजन’, ‘करमणूक’, ‘नवयुग’ या तत्कालीन नियतकालिकांमध्ये त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली. त्यांचे प्रस्तुतचे ‘मेघदूत — यक्षपत्नी’ हे चित्र विशेष गाजले. यामध्ये त्यांचे चित्रण कौशल्य पुरेपूर पाहायला मिळते. यक्षपत्नीच्या अंगावरील वस्त्राच्या चुण्या, जमिनीवरील नक्षीदार सुरई यातून त्यांच्या चित्रणातील बारकावे लक्षात येतात. त्यांची अनेक चित्रे आजही औंधच्या संग्रहालयात पाहायला मिळतात.
(चित्रसौजन्य— नेहरू सेंटर कलादालन, वरळी)

First Published on July 4, 2014 1:01 am

Web Title: chitra 7
Just Now!
X