वाचक शेफ: आवळय़ाचे रायते

प्रथम आवळे गॅसवर भाजून घ्यावेत. ते काळे झाल्यानंतर फडक्याने पुसावेत. त्याची बी वेगळी करून आवळय़ाचे तुकडे करून


 
97
आवळय़ाचे रायते

साहित्य : १०० ग्रॅ. आवळे. दोन टे.स्पून ओलं खोबरं, दोन मिरच्या कापून, दोन लसूण पाकळय़ा, चवीप्रमाणे मीठ, साखर, अर्धा टि.स्पून जिरं, १ चमचा लिंबूरस.

कृती : प्रथम आवळे गॅसवर भाजून घ्यावेत. ते काळे झाल्यानंतर फडक्याने पुसावेत. त्याची बी वेगळी करून आवळय़ाचे तुकडे करून त्यात खवलेलं खोबरं, जिरं, मिरच्या, मीठ, साखर, लिंबुरस घालून सगळं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. थोडं पाणी लागलं तर घालावं आणि बाऊलमध्ये काढून आवळय़ाच्या फोडींनी सजवावं.

मँगो पॅनाकोटा
साहित्य : चायना ग्रास, पायरी, हापूस व बदामी तीन आंब्यांचा रस, दोन टे.स्पून कॅस्टर शुगर, पाणी, ४ टे. स्पून फ्रेश क्रिम.

कृती : पॅन गरम करून १ बाऊल पाणी घालून दोन टे. स्पून चायना ग्रास घालून वितळेपर्यंत उकळवावं. कॅस्टर शुगर घालावी. फ्रेश क्रिम घालून उकळवावं. गॅस बंद करून आंब्यांचा रस घालावा. चांगलं मिक्स करून लहान लहान बाऊलमध्ये सेट करावं. फ्रिजमध्ये ठेवल्यास लगेच सेट होतं. आंब्याच्या ब्रेडबरोबरही हा पॅनाकोटा खाऊ शकतो. दोन ब्रेडमध्ये भरण्यासाठी चौकोनी चपटी शिट तयार करून दोन ब्रेडमध्ये भरून सॅण्डवीचप्रमाणे खाता येतं.

चॉकलेट केक

साहित्य : अर्धा वाटी मैदा, पाव वाटी रवा, अर्धा वाटी चॉकलेट पावडर, १ वाटी साखर, पाव वाटी दूध, १ टि. स्पून फ्रुट सॉल्ट, १ टि. स्पून बेकिंग पावडर, अर्धा टि.स्पून व्हॅनिला इसेन्स. १ टे. स्पून तूप. गार्निशिंगसाठी (सजावटीसाठी) बडिशेपच्या गोळय़ा, वेगवेगळय़ा आकाराचे बाऊल.
कृती : साखर व तूप एकत्र मिक्स करावं. त्यात दूध घालून फेटावं. त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून चाळून घालावं. चॉकलेट पावडर, रवा घालावा. चांगलं मिक्स करावं. ओव्हन २५० अंशाला गरम करून घ्यावा. वरील मिश्रण बाऊलमध्ये घालून ओव्हनमध्ये बेक करत ठेवावं. २५ मिनिटं ठेवावं. नंतर बाहेर काढावं. त्यावर चॉकलेटचं आईसिंग करावं.

चॉकलेट आईसिंग साहित्य : अर्धा कप जाड क्रीम, १२५ ग्रॅम चॉकलेट पावडर, १टे. स्पून आइसिंग शुगर, १ टे. स्पून कॉर्न फ्लोअर.
कृती : क्रीम उकळेपर्यंत गरम करावं. त्यात आईसिंग शुगर, कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावं, उतरवून त्यात चॉकलेट पावडर घालावी. ढवळावं. थंड आणि घट्ट झाल्यावर केकवर घालावं. बडिशेपच्या गोळय़ांनी सजवावं.

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Food recipes

Next Story
रूचकर: ओट्स उपमा
फोटो गॅलरी