इटलीमधले सिसिली हे पाहायलाच हवे असे बेट. प्राचीन राजवाडा, थिएटर, कॅथड्रिलसारख्या वास्तू, रमणीय समुद्रकिनारा, वेगवेगळी चविष्ट फळफळावळ यामुळे सिसिलीची ट्रीप अविस्मरणीय ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इटली म्हटले की आपल्याला पिझ्झा, कॅनलोनी, पास्ता या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण इटली म्हणजे एवढेच नाही, तर त्या पलीकडेही देशात बघण्यासारखे बरेच आहे. त्यात भरपूर वायनरीज्, ऑलीव्ह गार्डन्स्, विशाल, संपन्न समुद्रकिनारा व त्यातलेच सिसिली हे बेट या गोष्टी तर आवर्जून बघायलाच हव्यात अशा. इटली देशाच्या वायव्य दिशेचे आयोनिअन समुद्रातले बेटही पाहण्यासारखे. रोम, इटली या देशांत फार पूर्वीपासूनच ख्रिश्चन धर्माचे प्राबल्य होते. त्यामुळे या देशांत चर्चेसना तोटा नाही. हे बेट तसे अरब देश, टर्कस, उत्तर आफ्रिकन् देशांना  जवळचे तसेच नॉर्वेचे समुद्री चाचे व्हायकिंग म्हणजेच नॉर्मनस् यांच्यासाठीचे सुद्धा सोयीचे. इथे धनधान्याची सुबत्ता असल्यामुळे साहजिकच इतर देशांचे व्यापारी लोक येथे येत राहिले. आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनाला जातो तेव्हा सगळ्याच गोष्टी आपण जाऊन बघू शकत नाही हे तर ओघानेच आले.  त्यामुळे हॉप ऑन हॉप ऑफ बसचा पर्याय उत्तम ठरतो. ज्या गोष्टी आपल्याला भावतात त्या आपण उतरून पाहू शकतो.

मराठीतील सर्व पर्यटन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sicily island
First published on: 09-10-2015 at 01:02 IST