आपण मुलांशी बोलतो, त्यांचं कौतुक करतो, त्यावर मुलं जी प्रतिक्रिया देतात त्याकडे पालकांनी गंभीरपणे पाहिलं पाहिजे. मुळात फार नेमके शब्द कौतुक करताना वापरले पाहिजेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किशोरवयीन मुलांशी संवाद कायम राखताना अगदी प्रेमळ, सजग पालकांनाही कधी कधी अडखळायला होतं. पालकांनी रागावलेलं त्यांना चालत नाही आणि ही मुलं मात्र त्यांच्यावर हरघडी रागावणार, रुसणार हे जसं एक वास्तव असतं तसंच पालकांना अडखळायला लावणारं आणखी एक किशोरवयीन मुलांच्या बाबतीतलं वास्तव असतं. रागावलेलं या मुलांना आवडत नाही म्हणून पालकांना वाटतं, की गोड बोलून, प्रसंगी त्यांना थोडं हरभऱ्याच्या झाडावर चढवून मुलांशी संवाद साधला तर गाडं रुळावर येईल. पण बरेचदा तो डावही फसतोच. कधी कधी अगदी मनापासून केलेलं कौतुकही या मुलांना अगदी मानभावीपणाचं वाटतं.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praising your kids
First published on: 31-10-2014 at 01:22 IST