१. २१६ : ६ :: १००० : ?

२. सचित आणि प्रसाद हे एका रांगेत उभे आहेत. सचितचा रांगेत डावीकडून ११ वा तर उजवीकडून १२ वा क्रमांक आहे. प्रसादचा रांगेत डावीकडून १५ वा क्रमांक असेल तर रांगेत त्याचा उजवीकडून क्रमांक कोणता

३. १,८,२७,६४,१२५,—,३४३,५१२.. तर संख्यामालेतील — या स्थानी असणारी संख्या कोणती?

४. ३, ५, ६,१० आणि १५ या सर्व संख्यांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती?

५. १४८ आणि १८५ या संख्यांचा महत्तम सामाईक विभाजक कोणता?

उत्तरे स्पष्टीकरणासहित

१. उत्तर : १०; स्पष्टीकरण : पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी असलेला संबंध ओळखून तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी त्याच प्रमाणातील असलेला संबंध शोधून काढणे ही अशा प्रश्नातील गोम असते. येथे २१६ हा ६ या संख्येचा घन आहे. तर १००० हा घन असलेली संख्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. म्हणून उत्तर १०.

२. उत्तर : ८ वा; स्पष्टीकरण : सचितचा रांगेतील दोन्ही बाजूंचा क्रमांक लक्षात घेता रांगेतील मुलांची एकूण संख्या १२+१० म्हणजेच २२ होईल. जर प्रसादचा रांगेतील क्रमांक डावीकडून १५ वा असेल तर उजवीकडून त्याचा क्रमांक २२ पैकी १४ वजा जाता, ८ वा असेल. १४ वजा केले कारण डावीकडून १५ वा क्रमांक प्रसादचा आहे, याचाच अर्थ त्याच्या आधी १४ मुले उभी आहेत.

३. उत्तर : २१६; स्पष्टीकरण : संख्यामालेत प्रत्येक क्रमागत नैसर्गिक संख्येचा घन आहे. १ चा घन १, २ चा घन ८, ३ चा घन २७. या क्रमाने ६ चा घन म्हणजेच २१६ रिकाम्या जागी येईल.

४. उत्तर : ३०; स्पष्टीकरण : आपण ३, ५, ६, १० आणि १५ या संख्यांचे पाढे लक्षात घेता आपल्याला ही संख्या मिळणे सोपे जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. उत्तर : ३७; स्पष्टीकरण : १८५ या संख्येला १४८ ने भागावे. बाकी ३७ उरते. त्यानंतर या बाकीने १४८ ला भागण्याचा प्रयत्न करावा. येथे भागाकार नि:शेष येतो, म्हणजेच बाकी शून्य उरते. म्हणून दोन्ही संख्यांना ज्या संख्येने नि:शेष भाग जातो अशी संख्या म्हणजेच मसावि ३७.