डोके लढवा

१. राजीव, राम, राघव आणि श्याम हे एकाच वर्गात शिकत आहेत. पैकी श्याम आणि राम यांच्या आजच्या वयाची बेरीज २४ वर्षे आहे. दहा वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज ४४ वर्षे असेल. तर त्यांची आजची वये किती?

१. राजीव, राम, राघव आणि श्याम हे एकाच वर्गात शिकत आहेत. पैकी श्याम आणि राम यांच्या आजच्या वयाची बेरीज २४ वर्षे आहे. दहा वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज ४४ वर्षे असेल. तर त्यांची आजची वये किती?

२. १२:१४४ ::२४:?
३. धवल कार्यालयात दररोज गाडीने जातो. प्रवासाच्या एकूण वेळापैकी पहिला निम्मा भाग तो ४० किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवतो. तर उर्वरित निम्मा वेळ तो ६० किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवतो. कार्यालयात जाण्यासाठी त्याला दोन तास लागत असतील तर घर ते कार्यालय यातील अंतर किती?
४. ११, १३, १७, १९, २३, २९, ३१, ३७, ४१, ४३, ?
५. एका गोठय़ात दोन दूधवाले बसले आहेत. गोठय़ातील एकूण पायांची संख्या ४८ असेल तर गोठय़ातील जनावरांची संख्या किती?

उत्तरे स्पष्टीकरणासहित
१. उत्तर – प्रत्येकी १२ वर्षे; स्पष्टीकरण – चौघेही जण एकाच वर्गात शिकत आहेत म्हणजेच त्यांचे वय समान आहे. पैकी दोघांच्या वयाची बेरीज २४ असेल तर प्रत्येकाचे वय बरोबर २४ च्या निम्मे म्हणजेच, १२ वर्षे असेल.
२. उत्तर – ५७६; स्पष्टीकरण – पहिल्या दोन संख्यांमधील संबंध ओळखून तिसऱ्याचा तसाच संबंध असलेली चौथी संख्या शोधायची आहे. १४४ हा १२ चा वर्ग आहे. म्हणजेच आपल्याला २४ या संख्येचा वर्ग शोधायचा असून ती संख्या ५७६ येते.
ं३ उत्तर – १०० किलोमीटर; स्पष्टीकरण – दोन तास म्हणजेच १२० मिनिटे. पहिला निम्मा वेळ धवल प्रति तास ४० किलोमीटर वेगाने गाडी चालवतो. म्हणजेच एका तासात तो ४० किलोमीटर अंतर कापतो. पुढील तासाभरात तो ६० किलोमीटर प्रतितास या वेगाने म्हणजेच ६० किलोमीटर अंतर कापतो. म्हणजेच दोन तासांत कापलेले अंतर या दोहोंची बेरीज म्हणजेच १०० किलोमीटर.
४. उत्तर – ४७; स्पष्टीकरण – ११ नंतरच्या क्रमागत मूळ संख्या दिल्या आहेत. त्यामुळे ४३ नंतर येणारी क्रमागत मूळ संख्या म्हणून ४७ हे उत्तर. मूळ संख्या म्हणजे ज्याला ती संख्या व १ या दोहोंव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही ती संख्या.
५. उत्तर – ११; स्पष्टीकरण – प्रत्येक जनावरास चार पाय. तर दोन दूधवाले प्रत्येकी दोन पायांचे. गोठय़ातील एकूण पायांची संख्या ४८. त्यातून दोन दूधवाल्यांचे ४ पाय वजा केल्यावर उरले ४४ पाय. म्हणून ४४/४ म्हणजेच ११ जनावरे.
स्वरूप पंडित

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Puzzle