२० व्या शतकाच्या पूर्वार्धात वास्तववादी शैलीमध्ये काम करणाऱ्या दिग्गज शिल्पकारांमध्ये बाळाजी वसंत तालीम यांचा समावेश होतो. त्यांनी जेजे मधून शिल्पकलेचे प्रशिक्षण घेतले. १९११ साली त्यांना प्रतिष्ठेचे ‘लॉर्ड मेयो’ पदकही मिळाले. १९२३ आणि १९३२ या दोन वर्षी त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक कलाप्रदर्शनातील मानाचे मानले जाणारे सुवर्णपदकही मिळाले. प्रस्तुत छायाचित्रात दिसणारे ‘टकळी’ हे १९३२ साली सुवर्णपदक मिळालेले शिल्प आहे. यातील स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भावविभ्रम, तिची बैठक कापसाचा मऊशारपणा, टकळी चालवत असतानाची बोटांची पकड या साऱ्या बाबी नेमक्या पद्धतीने त्यात आल्या आहेत. तालीम यांची सर्वात गाजलेली शिल्पकृती म्हणजे शिर्डी येथे समाधिस्थळावर साकारलेली साईबाबांची मूर्ती!
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2014 रोजी प्रकाशित
शिल्प
२० व्या शतकाच्या पूर्वार्धात वास्तववादी शैलीमध्ये काम करणाऱ्या दिग्गज शिल्पकारांमध्ये बाळाजी वसंत तालीम यांचा समावेश होतो. त्यांनी जेजे मधून शिल्पकलेचे प्रशिक्षण घेतले.

First published on: 09-05-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa