‘फॅन्ड्री’ या आपल्या पहिल्याच सिनेमातून लक्ष वेधून घेणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळेचा दुसरा सिनेमा या महिनाअखेरीला येतो आहे, ‘सैराट’. या चित्रपटाच्या नायिकेला पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदर्शनाआधीच उत्सुकता निर्माण करणाऱ्या चित्रपटांमध्ये सध्या सैराटचं आणि अर्थातच नागराज मंजुळेचं नाव सध्या चर्चेत आहे. निर्मितीपासून असलेला झी स्टुडिओचा सहभाग, सोशल मीडियावरील प्रमोशन, विषयाचं नावीन्य, चित्रपटाचे जगावेगळं नाव आणि अर्थातच नागराजसारखा पठडीबाहेरचं काम करू पाहणारा दिग्दर्शक हे सैराटच्या उत्सुकतेमागचे कारण म्हणावे लागेल. हा चित्रपट नेमका काय आहे, कथानकाचा बाज कसा आहे आणि नागराजने त्यात नेमकं काय केलंय याबाबत अनेक तर्कवितर्क केले जाताना दिसतात. पण नेमकं कथासूत्र काय आहे यावर मात्र काहीसं मौनच आहे.

मराठीतील सर्व सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sairat nagraj manjule
First published on: 15-04-2016 at 01:21 IST