scorecardresearch

गार्लिक पनीर टिक्का

पनीरचे मध्यम आकाराचे सारखे तुकडे करून घ्यावेत.

साहित्य:

२५० ग्रॅम पनीर, अर्धी वाटी लसूण (बारीक कापलेला), अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी क्रीम, अर्धा चमचा काळी मिरी, एक चमचा हळद, अर्धी वाटी कोथिंबीर (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार.

कृती :

पनीरचे मध्यम आकाराचे सारखे तुकडे करून घ्यावेत. लसूण, काजू, क्रीम, काळी मिरी पावडर, हळद, मीठ. सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घ्यावे. त्यात पनीरचे तुकडे टाकून एक दिवस मॅरिनेट करून घ्यावे. एका पसरट काचेच्या भांडय़ात हे तुकडे ओळीने लावून मायक्रो मीडियमवर सहा ते आठ मिनिटे ठेवावे. त्यावर कोथिंबीर टाकून सव्‍‌र्ह करावे. हा टिक्का खूप फिका असल्याने जास्त तिखट लागत नाही.

टॉमेटो राइस

साहित्य:

एक वाटी बासमती तांदूळ, दोन वाटी पाणी, एक-दोन चमचे तेल, तीन-चार लाल मिरची, पाव चमचा हिंग, पाच-सहा कढीपत्ता, एक चमचा धणे (बारीक केलेले) एक चमचा मोहरी, तीन-चार टॉमेटो (कापलेले), एक चमचा साखर, पाच-सहा बेसील पाने, अर्धी वाटी कोथिंबीर, मीठ.

कृती :

एका काचेच्या बाऊलमध्ये तेल टाकून लाल मिरची, हिंग, धणे, टोमॅटो, बेसील पाने, कढीपत्ता, मोहरी, साखर व मीठ टाकून झाकण ठेवून मायक्रो लोवर पाच ते सहा मिनिटे ठेवावे. या काळात मध्ये मध्ये थोडेसे ह्य़ा फोडणीला हलवून घ्यावे. काचेच्या बाऊलमध्ये तांदूळ व पाणी टाकून मायक्रो हायवर आठ ते दहा मिनिटे शिजवून घ्यावे. शिजलेला भात व टॉमेटोचे मिश्रण हळुवार मिक्स करून त्यावर कोथिंबीर टाकून रेडी करावा. सव्‍‌र्ह करायच्या अगोदर मायक्रो मीडियमवर तीन ते पाच मिनिटे ठेवून गरम गरम सव्‍‌र्ह करावा.

बनाना नटमेग केक

साहित्य:

दीड वाटी मैदा, ल्ल    १ वाटी साखर (दळलेली), ३ अंडी, १ वाटी दूध, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा जायफळ पावडर, २५० ग्रॅम बटर, ५ ते ६ केळी.

कृती :

काचेच्या बाऊलला थोडेसे तेल लावून बटर पेपर लावून ठेवावे. केळी व जायफळ मिक्सरमधून काढून पेस्ट तयार करून घ्यावी. मैदा, साखर, बेकिंग पावडर सर्व एकत्र चाळून घ्यावे. अंडी फेटून घ्यावी.

मैदा, साखरच्या मिश्रणामध्ये बटर टाकून ब्रेडक्रमसारखे मळून घ्यावे. त्यात फेटलेले अंडे व दूध टाकून सर्व मिश्रण एकत्रित करावे. त्यात केळीचे तुकडे टाकून हळुवार मिक्स करावे. हे सर्व मिश्रण तयार केलेल्या काचेच्या बाऊलमध्ये टाकून मायक्रो मीडियमवर ८ मिनिटे ठेवावे. त्यानंतर मायक्रो हाय व १-२ मिनिटे ठेवून काढावे. जर मध्ये केक सॉफ्ट असेल तर अजून १-२ मिनिटे मीडियमवर ठेवावे. थंड झाल्यावर स्लाइस करून सव्‍‌र्ह करावे. हवाबंद डब्यात हा केक ५-६ दिवस चांगला राहतो.

स्पायसी राजमा सूप

साहित्य:

अर्धी वाटी राजमा (एक दिवस पाण्यात भिजवून ठेवलेला), अर्धी वाटी कोथिंबीर (चिरलेली), अर्धी वाटी उकडलेल्या बटाटय़ाचा कीस, मीठ चवीनुसार, चार-पाच हिरव्या मिरच्या (बारीक कापलेली), तीन-चार चमचे बटर, लसूण चार-पाच  पाकळ्या (बारीक कापलेल्या)

कृती :

राजमा कुकरमधून शिजवून घ्यावा. काचेच्या भांडय़ात बटर, लसूण, हिरवी मिरची टाकून मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. त्यात बटाटय़ाचा कीस व शिजवलेला राजमा व दीड वाटी पाणी टाकून मायक्रो मीडियमवर आठ-दहा मिनिटे ठेवावे. नंतर मीठ व कोथिंबीर टाकून मायक्रो लोवर दोन मिनिटे ठेवून गरम गरम सूप सव्‍‌र्ह करावे.

मुर्ग मलई कबाब

साहित्य:

२५० ग्रॅम चिकन खिमा, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा तिखट, अर्धा चमचा बडीशेप, मीठ चवीनुसार, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जायफळ.

कृती :

एका भांडय़ात चिकन खिमा, लसूण पेस्ट, तिखट, बडीशेप, तूप, जायफळ पावडर व मीठ टाकून नीट मळून घ्यावे. किमान एक दिवस तरी मॅरीनेट करून फ्रिजमध्ये ठेवावे. छोटे-छोटे गोळे किंवा लांबट आकारांचे गोळे एका काचेच्या पसरट भांडय़ात थोडय़ा तुपावर मायक्रो हायवर दोन मिनिटे ठेवावे. नंतर या कबाबना उलटवून परत मायक्रो हायवर दोन मिनिटे ठेवावे. गरम गरम ग्रीन चटणीसोबत सव्‍‌र्ह करावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व स्मार्ट कुकिंग ( Smart-cooking ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Food recipes

ताज्या बातम्या