या सदरातील हे पहिले चित्र आहे मनोज साकळे या कलावंताचे. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या सामाजिक गोष्टी, स्थित्यंतरातील बदल मनोजमधील कलावंत टिपत असतो. त्यातूनच मग अशी ही हरवलेल्या पोस्ट कार्डाची कहाणी उभी राहते. हरवलेलं पोस्टकार्ड, हरवलेलं बालपण, तो पूर्वीचा खेळ.. जो हल्ली फारसं कुणी खेळताना दिसत नाही.. काय काय हरवत चाललंय या पोस्टकार्डाप्रमाणे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला काय वाटलं हे चित्र पाहून?
गेल्या वर्षी याच पानावर आपण भारतीय चित्रेतिहासातील जुन्या पिढीतील कलावंतांची चित्रे पाहिली व त्यांची वैशिष्टय़ेही समजून घेतली. २०१५ या नव्या वर्षांत आता आपण तुलनेने तरुण असलेल्या, समकालीन कलावंतांकडे वळतो आहोत. त्यांची चित्रं-शिल्प, मांडणीशिल्प असे अनोखे प्रकार तुम्हाला इथे पाहता येतील. शिवाय त्याबाबत असलेलं तुमचं मतही व्यक्त करता येईल.

साप कात टाकतो हे आपल्याला माहीत असतं.. फुलपाखराचा विकास कोशामध्ये होतो आणि मग कोशत्याग करून ते बाहेर पडतं.. हेही अनेकदा ठाऊक असतं. पण केवळ त्यांचाच नव्हे तर अशा अनेक कीटकांचा जन्म अशा प्रकारे कोशत्यागातूनच होतो. तो मागे राहिलेला कोश नंतर जंगलात पानांवर लटकताना अनेकदा पाहायला मिळतो, आपल्याला वाटतं मृत्यूनंतर मागे राहिलेला एखाद्या कीटकाचा तो सांगाडा असावा. पण तो असतो कोश.
त्या कोशातून कीटक नेमका बाहेर पडत असतानाचा तो क्षण म्हणजे त्याचा जन्मक्षणच असतो. असा क्षण तुम्हाला नेमका टिपता येणं हे छायाचित्रकाराचं नेमकं कौशल्य असतं.. असाच एक नेमका क्षण टिपला आहे, वेदवती पडवळ हिने..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special platform for upcoming artists by lokprabha
First published on: 02-01-2015 at 01:01 IST