scorecardresearch

Premium

टेकरिव्ह्य़ू : नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन एलजी जीथ्री!

गेल्याच आठवडय़ात एलजीने अभिनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांच्या महत्त्वाकांक्षी अशा एलजी जीथ्री मालिकेचे अनावरण केले आणि ही उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणली.

टेकरिव्ह्य़ू : नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन एलजी जीथ्री!

गेल्याच आठवडय़ात एलजीने अभिनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांच्या महत्त्वाकांक्षी अशा एलजी जीथ्री मालिकेचे अनावरण केले आणि ही उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणली. या मॉडेल्सच्या केवळ १५ हजार उत्पादनांचीच निर्मिती कंपनीने केली असून या सर्व मॉडेल्सवर अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी असणार आहे. त्यातील काही भाग्यवंतांना प्रत्यक्ष बच्चन यांना भेटण्याची संधीही मिळणार आहे.
एलजी जीथ्री मालिकेतील या स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये असलेला ५.५ इंच आकाराचा डिस्प्ले हा क्वाड एचडी डिस्प्ले या प्रकारात मोडणारा आहे. फूल एचडी डिस्प्लेच्या अडीच पट त्यामुळे प्रतिमेची सुस्पष्टता केवळ वाखाणण्याजोगीच आहे. याशिवाय एरवी डिजिटल कॅमेऱ्याला लेझर ऑटोफोकसची सोय असते, त्याचप्रमाणे एलजीने प्रथमच स्मार्टफोनलाही लेझर ऑटो फोकसची सोय करून दिली आहे. त्यामुळे फोटोग्राफीमधील चित्रणही अधिक सुस्पष्ट झाले आहे. आणि परिणामी कॅमेरा आणि स्मार्टफोन यामधील अंतरही कमी झाले आहे. या फोनचे मेटॅलिक डिझाईनही चांगल्या प्रकारचे आहे. दिसायला आकर्षक आणि वापरायलाही सोयीचे. याची बॅटरी तब्बल ३००० एमएएच क्षमतेची असून त्यामुळे ती दीर्घकाळ चालते. यातील इंटर्नल मेमरी स्टोरेज तब्बल १६ जीबी व ३२ जीबी एवढी देण्यात आली असून एक्स्पांडेबल मेमरी तब्बल १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. भरपूर क्षमता असलेला असा हा नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४७,९९० (१६ जीबी) रु. ५०,९९० (३२ जीबी)

एलजी जीथ्री – वैशिष्टय़े
आकार – १४६.३ ७ ७४.६ ७ ८.९ मिमी.
वजन – १४९ ग्रॅम्स
प्रोसेसर – क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०१
(क्वाड कोअर, सुमारे २.५ गीगाहर्टझ्)
डिस्प्ले – ५.५ इंच क्वाड एचडी आयपीएस
(२५६० ७ १४४०, ५३८ पीपीआय)
इनबिल्ट मेमरी – १६/३२ जीबी
मेमरी क्षमता – १२८ जीबी (मायक्रो एसडी कार्डाद्वारे)
बॅटरी – ३,००० एएमएच
ऑपरेटिंग सिस्टिम – अँड्रॉइड ४.४.२ किटकॅट
कनेक्टिविटी – वायफाय, ब्लूटूथ. एनएफसी, स्लिमपोर्ट,
ए- जीपीएस, यूएसबी २
रंग – काळा, पांढरा. सोनेरी, जांभळा व लाल
इतर वैशिष्टय़े – स्मार्ट कीबोर्ड, स्मार्ट नोटीस, नॉक कोड टीएम, गेस्ट मोड आदी

मायक्रोमॅक्स नाइट!

अलीकडेच मायक्रोमॅक्सने नाईट नावाचे थ्रीजी मॉडेल बाजारपेठेत आणले. त्याच्या प्रसारासाठी आता मायक्रोमॅक्स आणि व्होडाफोन या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. डेटा पॅक नसेल तर मग थ्रीजी फोनला फारसा काही अर्थ नसतो. हेच लक्षात घेऊन या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांशी करार केला आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत मायक्रोमॅक्स नाईट हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्या ४८ तासांत डेटापॅक सुरू करणाऱ्या ग्राहकांना व्होडोफोनतर्फे २ जीबी डेटा सुरुवातीच्या काळात मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस नाईट या मॉडेलमध्ये १.७ गिगाहर्टझ् क्षमतेचा ऑक्टा कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यामुळे या फोनवर वेगात काम करता येते. त्याला २ जीबी रॅमची जोड मिळाल्याने एकाच वेळेस कितीही विंडोज ओपन राहिल्या तरी फोन हँग होत नाही. याचा डिस्प्ले ५ इंची एफएचडी प्रकारात मोडणारा आयपीएस पद्धतीचा आहे. याला मागच्या बाजूस १६ मेगापिक्सेल तर समोरच्या बाजूस ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी क्षमताही मायक्रोमॅक्सने वाढविली असून या मॉडेलसाठी २३५० एएमएच क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे.
सध्या इंटर्नल मेमरीच अधिक देण्याचा ट्रेंड असून त्यानुसार कंपनीने या मॉडेलला तब्बल ३२ जीबीची इंटर्नल मेमरी दिली आहे. तर यासाठी अँड्रॉइड ४.४.२ ही नवीन किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. काळा व सोनेरी आणि पांढरा व सोनेरी अशा दोन आकर्षक रंगसंगतीमध्ये ही मॉडेल्स उपलब्ध आहेत.
भारतीय बाजारपेठेतील
किंमत : रु. १९,९९९/-

झिंक झेड – १८ ७ इंची टूजी कॉिलग टॅब्लेट

तरुणाईमध्ये सध्या क्रेझ आहे ती कॉिलग टॅब्लेटची. पण कोणत्याही मोठय़ा ब्रॅण्डेड कंपनीचा टॅब्लेट घ्यायला गेले तर किमान १२ हजार रुपयांच्यावर पैसे हातात असावे लागतात. आणि कॉलेजिअन्सना प्रश्न भेडसावत असतो तो पॉकेट मनीचा. अशांसाठीच आता िझक या कंपनीने झेड- १८ नावाचा सात इंची कॉिलग टॅब्लेट बाजारात आणला आहे. रु. ६,००९ एवढीच त्याची किंमत असल्याने तो तसा परवडणाराही असेल. यासाठी एथ्री १.५ गिगाहर्टझ् डय़ूएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून त्यासाठी ४.२.२ ही अँड्रॉइड जेली बीन ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. याच्या स्क्रीनचे रिझोल्युशन ८०० गुणिले ४८० पिक्सेल्सचे आहे. याची इंटर्नल मेमरी ४ जीबी असून त्यासाठी ५१२ एमबी रॅम वापरण्यात आले आहे. एक्स्टर्नल मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सोयही आहे. मागच्या बाजूस २ मेगापिक्सेल प्युअरव्ह्य़ू कॅमेरा देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६,००९

प्रोसेसर – ऑल विनर ए२३ डय़ुएल कोअर
आकार – ७ इंची
रिझोल्युशन – ८०० गुणिले ४८०
ऑपरेटिंग सिस्टिम – अँड्रॉइड ४.२.२
मेमरी – ५१२ एमबी
स्टोरेज – ४ जीबी
एक्स्टर्नल मेमरी – ३२ जीबी (मायक्रो एसडी कार्डाद्वारे)
कनेक्टिविटी – वायफाय, ब्लूटूथ.
कॅमेरा – समोरच्या बाजूस ०.३ मेगापिक्सेल, मागच्या बाजूस २ मेगापिक्सेल
बॅटरी – २५०० एएमएच

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tech review lg g3

First published on: 25-07-2014 at 01:06 IST

संबंधित बातम्या

×