रुचकर विशेष
मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com
रोज सकाळी उठल्यावर घरात नाश्त्याला काय करायचं, हा प्रत्येक गृहिणीसमोरचा प्रश्न असतो. रोज तेच तेच पदार्थ करण्याचाही तिला कंटाळा आलेला असतो. हे चटपटीत आणि चवदार पदार्थ सगळ्यांनाच आवडतील.
चीज क्रॅकल्स
साहित्य :
रवा एक वाटी ९ दूध एक वाटी
उकडलेले बटाटे दोन
आलं-लसूण पेस्ट एक टी स्पून
ब्रेड क्रम्स गरजेनुसार
तेल तळण्यासाठी
तीन ते चार चीज क्यूबचे उभे काप
मिरची पेस्ट चवीनुसार ९ बटर
कृती :
जाड बुडाच्या भांडय़ात दूध तापवा. त्यात रवा घालून एकजीव करा. झाकून वाफ येऊ द्या. नंतर त्यात बटाटे स्मॅश करून घाला. चवीनुसार मीठ, आलं, लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, बटर घालून छान एकजीव करा. याच्या पाऱ्या करा. त्यात चीजचा काप ठेवा. उभट आकार द्या. ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तेलात तळून घ्या.
कोणत्याही आवडीच्या सॉस, चटणीबरोबर सव्र्ह करा. यात रवा, दूध, चीज असे पौष्टिक पदार्थ आहेत. त्यामुळे पोटभरीचे होते.
रताळ्याच्या घाऱ्या
साहित्य :
रताळे चार, गूळ एक वाटी, गव्हाचे पीठ दोन वाटय़ा (गरजेनुसार)
मीठ अर्धा टी स्पून ९ खसखस गरजेनुसार ९ तेल तळण्यासाठी
कृती :
रताळे साल काढून किसून घ्या. त्यात गूळ घालून शिजवा. गव्हाचे पीठ, मीठ घाला. छान एकजीव करा. प्लास्टिक पेपरवर छोटे-छोटे गोळे घेऊन थापून घ्या. त्यावर खसखस लावा. तेलात तळून घ्या. साजूक तुपासोबत या घाऱ्या छान लागतात. रताळे, गव्हाचे पीठ, गूळ यामुळे या घाऱ्या छान पौष्टिक होतात. तळायचे नसल्यास छोटय़ा पोळ्या लाटून तव्यावर तूप सोडून भाजून घ्या.
व्हर्मासिली व्हेज इडली
साहित्य :
इडलीचे पीठ चार वाटय़ा
शिजवलेल्या शेवया २ दोन वाटय़ा
बारीक चिरलेलं गाजर पाव वाटी
बारीक चिरलेले बिन्स पाव वाटी
बारीक चिरलेला फ्लॉवर, कोबी, मटार प्रत्येकी पाव वाटी
आलं-लसूण पेस्ट एक टी.स्पून
हिरवी मिरची पेस्ट अर्धा टी स्पून
मीठ, साखर चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
फोडणीसाठी जिरे, मोहरी, चिरलेला कढीपत्ता, चार टी स्पून तेल.
कृती :
इडलीच्या पिठामध्ये शेवया, सर्व भाज्या आलं-लसूण, मिरची पेस्ट, मीठ, साखर घाला. फोडणीसाठी तेल तापवा. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घाला. ही फोडणी मिश्रणावर घाला. एकत्र करा. इडलीच्या साच्यात घालून इडल्या वाफवून घ्या.
बिटाची टिक्की
साहित्य :
बीट एक ९ उकडलेले बटाटे दोन
लाल मिरची पावडर दोन टी स्पून ९ आलं-लसूण पेस्ट दोन टी स्पून
गरम मसाला पावडर दोन टी स्पून ९ रवा पाव वाटी
मैदा दोन टी स्पून ९ मीठ चवीनुसार
लिंबू रस एक टी स्पून.
कृती :
बीट उकडून घ्या. साल काढून किसून घ्या. त्यात बटाटे कुस्करून घाला. तिखट, मीठ, आलं, लसूण पेस्ट, मैदा, रवा, गरम मसाला पावडर सर्व घालून छान एकजीव करा. गोल चपटय़ा टिक्की रव्यात घोळवून घ्या. पॅनमध्ये चार टी स्पून तेल घाला. त्यावर टिक्की ठेवून श्ॉलो फ्राय करा. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या. पुदिन्याची चटणी किंवा सॉसबरोबर सव्र्ह करा. या टिक्कीतून भरपूर बीट खाल्ले जाते. एरवी बीटचे पदार्थ खूप कमी केले जातात. ज्यांना लोहाची कमतरता आहे, त्यांच्यासाठी हा पदार्थ छान आहे.
चायनीज करंज्या
साहित्य :
कोबी, गाजर, ढबू मिरची, बिन्स, कांदापात, कांदा या बारीक चिरलेल्या भाज्या प्रत्येकी अर्धी वाटी
शिजवलेल्या नूडल्स अर्धी वाटी ९ सोया सॉस एक टेबल स्पून
चिली सॉस एक टी स्पून ९ टोमॅटो सॉस एक टेबल स्पून
मीठ, साखर चवीनुसार ९ मिरी पावडर अर्धी टी स्पून
बारीक चिरलेलं आलं एक टेबल स्पून ९ बारीक चिरलेला लसण
हिरवी मिरची प्रत्येकी एक टेबल स्पून ९ तेल दोन टेबल स्पून.
पारीसाठी साहित्य :
मैदा एक वाटी ९ रवा अर्धी वाटी ९ गव्हाचे पीठ अर्धी वाटी ९ मीठ अर्धी टी स्पून
तेल दोन टी स्पून आणि तेल तळण्यासाठी.
कृती :
पारीचे सर्व साहित्य एकत्र करा. मळून घ्या. अर्धा तास ठेवा. कढईत दोन टेबल स्पून तेल तापवा, त्यात कांदा, आलं, लसण, मिरची परतून घ्या. गाजर, ढबू मिरची, बिन्स, कोबी घालून एकत्र करा. तिन्ही सॉस, मीठ, साखर, मिरी पावडर घाला. नूडल्सचे तुकडे करून घाला. एकत्र करा. भाजी गार करून घ्या. पिठाच्या पाऱ्या लाटून त्यात चायनीज सारण भरा, करंजीचा आकार घ्या. तेलात तळून घ्या. टोमॅटो सॉस, शेजवान सॉस बरोबर सव्र्ह करा. या करंज्या चवीला खूपच छान चटपटीत लागतात. पोटभरीचा पदार्थ होतो
पनीर चिल्ला
साहित्य :
मूगडाळ दोन वाटय़ा ९ पनीर दीडशे ग्रॅम ९ बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हे सर्व प्रत्येकी एक टेबल स्पून
मीठ चवीनुसार ९ हळद, हिंग प्रत्येकी अर्धी टी स्पून ९ तेल गरजेनुसार ९ लसूण
कृती :
मुगाची डाळ चार तास भिजवून ठेवा. बारीक वाटून घ्या. पनीरचे बारीक तुकडे करून घ्या. डाळीच्या मिश्रणात घाला. त्यातच आलं, लसूण, मिरच्यांचे तुकडे, हळद, हिंग, मीठ घाला. मिश्रण छान एकजीव करून घ्या. तव्यावर तेल किंवा बटर घालून हे मिश्रण त्यावर धिरडय़ाप्रमाणे पसरवून घ्या झाकून एक वाफ द्या. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. सव्र्ह करा. खूपच पौष्टिक पदार्थ होतो.
व्हेज िफगर्स
साहित्य :
गाजर, फ्लॉवर, कोबी प्रत्येकी किसून अर्धा कप
आलं, लसूण पेस्ट एक टी स्पून
हिरवी मिरची पेस्ट अर्धा टी स्पून ९ मीठ चवीनुसार
कॉर्न फ्लॉवर, मैदा प्रत्येकी चार टेबल स्पून
तेल तळण्यासाठी ९ तीळ गरजेनुसार.
कृती :
तिन्ही भाज्या एकत्र करा. त्यात आलं, लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, कॉर्न फ्लॉव्हर, मैदा सर्व एकत्र करून छान एकत्र करा. फिंगर्स एवढे रोल करा. तिळामध्ये घोळवून तेलात तळून घ्या. आवडीच्या सॉस बरोबर सव्र्ह करा. व्हेज फिंगर्समध्ये बीट, बटाटा अशा भाज्या किसून घातल्या तरी चालतील.
मुगाचे दहीवडे
साहित्य :
मूग (हिरवे किंवा पिवळे) एक वाटी
दही दोन वाटय़ा ९ धने-जिरे पावडर चवीनुसार
मिरची पावडर, चाट मसाला आवडीनुसार
लसूण चार पाकळ्या ९ जिरे दोन टी स्पून
तेल तळण्यासाठी ९ हिरव्या मिरच्या दोन
मीठ, साखर चवीनुसार
कृती :
मूग सात ते आठ तास भिजवून ठेवा. नंतर जिरे, मिरच्या, लसूण, मूग एकत्र वाटून घ्या. त्यात मीठ घालून एकत्र करा. गोल वडे करून तेलात तळून घ्या.
दह्य़ात मीठ, साखर घालून फेटून घ्या. तयार वडय़ांवर दही घाला. त्यावर मिरची पावडर, चाट मसाला, धने-जिरे पावडर घालून सव्र्ह करा. आवडीनुसार वरून बारीक शेव घातली तरी चालेल.
मूग सालासह असल्यामुळे पौष्टिक होतात
वडे तळायचे नसल्यास हे मिश्रण अप्पे पात्रात घालून आप्पे करून घ्या. तसे पण छान लागेल.
पालक पनीर बॉल
साहित्य :
चिरलेला पालक दीड वाटी
पनीर एक वाटी ९ उकडलेले बटाटे दोन
आलं, लसूण पेस्ट एक टी स्पून
हिरवी मिरची पेस्ट एक टी स्पून
मीठ चवीनुसार
गरम मसाला पावडर एक टी स्पून
एक टेबल स्पून जाडसर वाटलेले धने, जिरे
तेल तळण्यासाठी ९ रवा गरजेनुसार
मैदा दोन टी स्पून.
कृती :
पालक मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात पनीर, बटाटे, लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला पावडर, धने, जिरे पावडर सर्व एकत्र करा. दोन टी स्पून रवा, दोन टी स्पून मैदा, मीठ सर्व एकत्र करून छान एकजीव करून घ्या. गोल बॉल करून रव्यात घोळवून तेलात तळून घ्या. पालक पनीरचा वेगळा पदार्थ छान लागतो.
सॅन्डवीच इडली
साहित्य :
उडीद डाळ एक वाटी ९ तांदळाचा रवा तीन वाटी ९ मीठ चवीनुसार
हिरव्या लेयरसाठी :
पालक एक वाटी ९ पुदिना अर्धी वाटी ९ हिरव्या मिरच्या चार
लसूण चार पाकळ्या ९ एक टी स्पून जिरे
गुलाबी लेयरसाठी :
बिटाचे तुकडे अर्धी वाटी ९ लाल मिरची पावडर एक टी स्पून
लसूण चार पाकळ्या.
कृती :
उडीद डाळ आठ तास भिजवा. नंतर वाटून घ्या. तांदळाचा रवा धुवून घ्या. त्यात वाटलेली डाळ, मीठ एकत्र करा. परत आठ ते दहा तास ठेवा. या पिठाचे तीन भाग करा. एकात हिरवे साहित्य वाटून घाला, दुसऱ्या भागात गुलाबीचे साहित्य वाटून घाला. तिसरा भाग पांढराच ठेवा. इडलीच्या साच्याला तेल लावा. त्यावर हिरवे मिश्रण घाला. त्यावर पांढरे मिश्रण घाला. पाच मिनिटं मोठय़ा गॅसवर, दहा मिनिटं लहान गॅसवर शिजवा. नंतर काढून गुलाबी मिश्रण पसरवा. परत शिजवून घ्या. नंतर इडल्या काढून मधून कापून सव्र्ह करा. या तीन रंगांच्या इडल्या छान दिसतात. इडलीला तीन वेगवेगळे फ्लेव्हर्स येतात. छान पौष्टिक इडल्या तयार होतात.
अडई डोसा
साहित्य :
तांदूळ एक वाटी
मुगाची डाळ, उडीद डाळ, तूरडाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ प्रत्येकी पाव वाटी
मेथी दाणे आर्धा टी स्पून
लसूण चार पाकळ्या
हिरव्या मिरच्या चार
जिरे एक टी स्पून
मीठ चवीनुसार.
कृती :
सर्व डाळी, तांदूळ, मेथी दाणे एकत्र करून पाच ते सहा तास भिजवून ठेवा. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या वाटून या मिश्रणात घाला. मीठ घाला. एकत्र करा. तव्यावर नेहमीप्रमाणे डोसे करा. चटणी सोबत सव्र्ह करा. हा डोसा अतिशय पौष्टिक होतो. चवीला खूपच छान लागतो.
गव्हाच्या पिठाच्या नमकीन पुऱ्या
साहित्य :
गव्हाचे पीठ दोन वाटय़ा
जाडसर वाटलेले जिरे दोन टी स्पून
जाडसर वाटलेले मिरे दोन टी स्पून
मीठ चवीनुसार
हिंग अर्धा टी स्पून
तेलाचे मोहन पाव वाटी
कृती :
गव्हाचे पीठ जिरे, मिरे, मीठ, तेलाचे मोहन सर्व एकत्र करा. पीठ मळून घ्या. तासभर ठेवा. नंतर याच्या चौकोनी पुऱ्या लाटून त्याला सुरीने टोचून घ्या. तेलात तळून घ्या. खुसखुशीत पुऱ्या तयार.
या पुऱ्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी खूपच चांगल्या आहेत.
एरवी चहा सोबत, मधल्या वेळेस खायला छान.
टेस्टी वडे
साहित्य :
ज्वारीचे पीठ अर्धी वाटी
तांदळाचे पीठ अर्धी वाटी
बेसन अर्धी वाटी
गव्हाचे पीठ अर्धी वाटी
उडदाची डाळ चार तास भिजवलेली अर्धी वाटी
लसूण दहा-बारा पाकळ्या
हिरव्या मिरच्या सात ते आठ
जिरे दोन टीस्पून ९ मीठ चवीनुसार
ओवा अर्धा टीस्पून
तेल तळण्यासाठी
हळद, हिंग प्रत्येकी अर्धी टीस्पून
तीळ एक टीस्पून
कृती :
सगळी पीठं एकत्र करा. उडदाची डाळ वाटून घाला. त्यातच जिरे, लसूण, मिरच्या वाटून घाला. ओवा, मीठ, हिंग, हळद, तिळ घाला. लागेल तसे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. आर्धा तास ठेवा. नंतर प्लास्टिकवर वडे थापून तेलात तळून घ्या.
मुटके
साहित्य :
बाजरीचे, ज्वारीचे, डाळीचे, गव्हाचे, तांदळाचे पीठ प्रत्येकी अर्धी वाटी
हिरव्या मिरचीची पेस्ट दोन टी स्पून
लसूण पेस्ट एक टी स्पून
जिरे पावडर दोन टी स्पून
मीठ चवीनुसार
कच्चे शेंगदाणे पाव वाटी
भिजवलेली हरभरा डाळ पाव वाटी
हळद पाव टी स्पून
फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, चार टी स्पून तेल
बारीक चिरलेली कोथिंबीर
खोवलेले ओलं खोबरं.
कृती :
सर्व पीठं एकत्र करा. त्यात जिरे पावडर, लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, मीठ, हळद घाला. कच्चे शेंगदाणे चिरून घाला. हरभरा डाळ घाला पीठ मळून घ्या. याचे मुटके करून मोदक पात्रात ठेवून वाफवून घ्या. तेल तापवा, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घाला. ही फोडणी मुटक्यांवर ओता. वरून खोबरं, कोथिंबीर घाला, गरमागरम मुटके खायला द्या. 4 हे मुटके टेस्टी लागतातच शिवाय पौष्टिकपण आहेत.
केळ्याचे बन्स
साहित्य :
पिकलेली केळी चार ९ मैदा एक वाटी
गव्हाचे पीठ एक वाटी ९ जिरे एक टीस्पून
लोणी अर्धी वाटी ९ पिठी साखर अर्धी वाटी
मीठ चवीनुसार ९ दही एक टीस्पून
कृती :
केळी छान मॅश करून घ्या. त्यात लोणी, साखर, मीठ, जिरे एकत्र करा. या मिश्रणात गव्हाचे पीठ आणि मैदा घालून छान एकजीव करा. पीठ मळून सात ते आठ तास ठेवून द्या. नंतर त्यांचे गोळे करून पुरीपेक्षा मोठय़ा आकाराचे लाटून तेलात तळून घ्या. खोबऱ्याच्या चटणीसोबत सव्र्ह करा. बन्स हा खूप आरोग्यदायी नाश्ता आहे. यात लागल्यास पीठ वाढवा.