परवा माझ्या शेजारच्या ब्लॉकमध्ये राहणारे देसाईकाका खूप अस्वस्थ दिसले. निवृत्त होऊन काही महिनेच झाले होते. शासकीय संस्थेच्या वरिष्ठ अधिकारपदावरून ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. पेन्शनचे काम पूर्ण झाले नसावे असे मला वाटले. पण त्यांचे दु:ख थोडे वेगळेच होते. ‘‘पेन्शनचा काही मुद्दा नाही सर. दु:ख याचे आहे, की पदावरून पायउतार झाल्यावर जे माझे ज्युनिअर महाशय माझ्या जागी बसले आहेत, ते इथे-तिथे सर्वत्र माझी बदनामी करत फिरतात : ‘यांच्या काळात असेच झाले’, ‘ही यांची माणसे..’ वगरे वगरे. ते असे वागतील अशी अपेक्षा नव्हती. इतकी वष्रे माझे सहकारी होते.. मग यांना आत्ताच काय झाले?’’ मी हे ऐकल्यावर मनापासून हसलो आणि म्हणालो, “Kaka, you are not an exception. This is the rule.”
शासकीय, निमशासकीय आणि थोडय़ाफार प्रमाणात खासगी सेवाक्षेत्रात हे असे चित्र पाहायला मिळतेच. यात तुमच्या नोकरीचा, उद्योगाच्या स्वरूपाचा, तुमच्या कार्यकाळाचा काहीही संबंध नसतो. खरं तर तुम्ही फक्त निमित्तमात्र असता. तुमच्या वारसदाराचे नवशिकेपण आणि चाचपडलेपण अजून संपलेले नसते. खरे तर ती त्याची न चेपलेली भीड असते. आपल्याला इतर सहकारी स्वीकारतील की नाही, याची साशंकता असते. आपल्या कामाची तुलना कधी उघडपणे, तर कधी दबक्या आवाजात पूर्वीच्या वरिष्ठांशी होईल आणि आपण त्यात उणे पडू, ही त्याची अपूर्णता असते. जे अभ्यासू आणि कष्टकरी असतात ते स्वत:ला कामात झोकून देतात, नव्या निर्मितीला आरंभ करतात आणि नव्या आराखडय़ांना आकार येऊ लागला की जुनी ठिपक्यांची रांगोळी हळूहळू पुसली जाऊ लागते. पण ज्यांना हे जमत नाही, ज्यांना वरवरचे काम करावयाचे असते, ज्यांची पुरेशी संस्था/ कार्यालय यांच्यावर पकड नसते, ते दुसरा शॉर्टकट स्वीकारतात. ते आपल्या आधीच्या अधिकाऱ्यांना दोष देतात. त्यांच्या निष्ठावंत सहकाऱ्यांची संभावना ‘त्यांची माणसे’ म्हणून करतात. आणि पर्यायाने सगळ्याच कर्मचाऱ्यांमध्ये अप्रिय होतात.
आपण कधीही मागच्यांना कमी लेखण्याची चूक करूनये. प्रत्येक काळ-वेळ वेगळी असते. त्यांनी केलेल्या कामामुळे संस्था टिकलेली असते, नावारूपाला आलेली असते. तुम्हाला आज मिळणारी ही संधी त्यांच्या सोन्यासारख्या कामाचेच फलित असते. निर्णय हे काळ-वेळसापेक्ष असतात. कालच्या गोष्टी आज कालबाह्य वाटतात. प्रसंगी अपुऱ्या आणि अप्रस्तुत वाटतात. पण त्या त्यावेळी तशा घडल्या म्हणून आज त्यांना कमी लेखता येऊ नये. आज माझा ऑफिसचा सूट शिवणाऱ्या िशप्याला मी कधी माझ्या हायस्कूलचा युनिफॉर्म शिवणाऱ्या टेलरला नावे ठेवताना पाहिले नाही.
पण हा मानवी स्वभाव आहे. अपरिपक्वता आणि अमर्यादशील बडबड यांचा हा परिपाक आहे. हा वैद्यक, व्यवस्थापन, उद्योग-व्यापार, राजकारण सर्वच क्षेत्रांत आढळतो. आज आपल्याला जे क्षितीज लाभले आहे, तेथपर्यंत हात पोहोचण्यासाठी आपण कोणाच्यातरी खांद्यावर बसलो आहोत, कोणत्यातरी शिडीचा आधार घेतला आहे, हे ते सोयीस्कर विसरतात. मी याला त्यांचा कृतघ्नपणाही म्हणणार नाही. कारण कृतज्ञ-कृतघ्नतेच्या परिघापर्यंतही त्यांची कर्तव्यपूर्ती पोहोचलेली नसते. नवनिर्माणाची ताकद ज्या हातांत नाही, त्यांनी पूर्वाश्रमींच्या कामाबद्दल बोटे मोडू नयेत. क्षेत्रे बदलतात तशी भाषा बदलते.”Oh, I am still clearing the previous mess!” वगरे वगरे. वैद्यक क्षेत्रात जेव्हा रुग्ण एका नवशिक्या डॉक्टरकडून ज्येष्ठ तज्ज्ञाकडे सल्ल्यासाठी जातो, तेव्हा काही ज्येष्ठांची मुक्ताफळे तर अगदी श्रवणीय असतात..”Oh, now you have come to the final destination…” “Oh! his age is my experience.” यापकी कोणत्याही वाक्याने रुग्णाच्या मनात आदर, विश्वास निर्माण होत नाही. झालीच तर फक्त भीती जन्म घेते.
मग तरीही लोक असे का वागतात? याचे एकमेव उत्तर म्हणजे मनुष्यस्वभाव. आपल्याला स्वीकारले जाईल की नाही, या भीतीपोटी पूर्वीच्या मंडळींना दोष देणे सुरू होते. आपले नसलेले ‘वजन’, ‘इम्प्रेशन’ इतरांवर टाकण्याचा तो केविलवाणा प्रयत्न ठरतो.
माझ्या संभाषणाने देसाईकाकांचे दु:ख हलके झाले. मी त्यांना म्हणालो, ‘‘काका, अकबर-बिरबलाची गोष्ट लक्षात ठेवा. बादशहाने काढलेली रेष लहान करण्यासाठी बिरबलाने फडके नाही वापरले, तर दुसरा खडू घेऊन त्यापेक्षाही मोठी रेष आखली. गरज असते ती नवी रेष पहिल्यापेक्षाही अधिक ठळक आणि लांब आखण्याची. म्हणूनच काका, मी माझ्या कंपासपेटीत खोडरबर ठेवलेले नाहीत. ठेवल्यात फक्त छान टोक केलेल्या नव्याकोऱ्या पेन्सिली.’’

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हेच आजच्या भारतीय लोकशाहीचे वास्तव
Major fire at Marathwada University premises
विद्यापीठ परिसरात आग; अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा