मानवी इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात माणूस कदाचित शिकारीसाठी एकत्र आला असेल. एखादा मोठा प्राणी पकडताना त्याला इतर लोकांची आवश्यकता भासली असेल आणि तिथून त्याने टोळ्या बनवून राहायला सुरुवात केली. शेतीचा शोध लागला आणि या फिरणाऱ्या टोळ्या एका जागी स्थिर झाल्या आणि माणसाच्या समूहाचा आकारही वाढला. मग एकत्र राहतानाचे समूहाचे काही नियम आले. आणि त्यातूनच हळूहळू संस्कृती, समाज, नतिकता या आणि अशा अनेक गुंतागुंतीच्या संकल्पना निर्माण झाल्या. माणसाचे जसजसे संस्कृतीकरण झाले तसा माणूस आणि त्याच्यापासूनच बनलेला समाज यांच्यात एक संघर्ष सुरू झाला. या संघर्षांच्या मुळाशी एक प्रश्न होता : माणूस आणि त्याच्या इच्छा, आशा, आकांक्षा, स्वप्न महत्त्वाचे की ज्या समूहात तो राहतो त्याचे नियम, त्याची तत्त्वे आणि त्याचे हित महत्त्वाचे? या प्रश्नाच्या उत्तरात दोन विचारसरणी दडलेल्या आहेत- ‘माणूस महत्त्वाचा’ असे मानणारी व्यक्तिवाद/ व्यक्तिस्वातंत्र्यवाद (Individualism) विचारसरणी आणि ‘समाज महत्त्वाचा’ मानणारी समूहवाद (Collectivism) विचारसरणी.

समूहवाद ही तशी आपल्याला जवळची संकल्पना. यात ‘आपण’ म्हणजे पूर्वेकडचे देश-जपान, चीन, भारत इत्यादी. या विचारसरणीमध्ये आपले कुटुंब, मित्रपरिवार, शेजारीपाजारी आणि अजून पुढे जाऊन आपली जात, धर्म, संस्कृती, देश याआधारे तयार झालेल्या समूहाला, समाजाला महत्त्वाचे मानले जाते. समूहापुढे एका माणसाच्या इच्छा आणि विचार कमी महत्त्वाचे मानले जातात. समूहवादी व्यवस्थेत स्वत:च्या सुखाचा त्याग करून समाजाच्या सुखासाठी जगणे हे अपेक्षित असते. आपल्या पुराणात, कथा-कादंबऱ्यांत, राजकीय आणि सामाजिक जीवनात समाजासाठीच जगणाऱ्या आणि लोकांच्या भल्यासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करणाऱ्यांना आपण नेहमीच नायकत्व बहाल केले आहे. ‘दुसऱ्यांना मदत करा’, ‘मिळून- मिसळून राहा’, ‘समाजाचे देणे चुकते करा’ ही वाक्ये आणि हे सगळं लिहीत असताना सारखा आलेला ‘आपण’ हा शब्द याच विचारसरणीचा परिपाक आहे. यात समूहाचे हित आणि सुख (Greater Good) हे एका माणसाच्या सुखापेक्षा नेहमीच श्रेष्ठ मानले जाते.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

व्यक्तिस्वातंत्र्यवाद ही पाश्चिमात्य संकल्पना. आजच्या काळात अमेरिका हा या विचारसरणीचे जोरदार समर्थन करणारा देश आहे. अमेरिकेची राजकीय, सामाजिक आणि आíथक जडणघडण याच तत्त्वावर झाली आहे. समाज हा माणसांपासून बनतो, त्यामुळे माणूस हाच केंद्रस्थानी असला पाहिजे असे ही विचारसरणी मानते. मला माझ्या सुखाचा, स्वार्थाचा विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यात इतर कोणालाही (ज्यात समाज, सरकार किंवा इतर कोणत्याही आधारावर बनलेला समूह येतो.) ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही अशी मांडणी व्यक्तिस्वातंत्र्यवाद करते. डार्वनिच्या ‘Survival of the fittest’ यावर विश्वास असलेली ही विचारसरणी प्रत्येक माणूस हा आत्मनिर्भर असावा अशी अपेक्षा करते. व्यक्तिस्वातंत्र्यवाद हा बऱ्याच क्षेत्रांतल्या संकल्पनेच्या मुळाशी आहे. अर्थशास्त्रात बाजारातील व्यवहारांमध्ये नगण्य सरकारी हस्तक्षेप असलेली ‘लाईझे-फेयर (laissez faire हा फ्रेंच शब्द आहे. ज्याचा शब्दश: अर्थ- ‘करू देणे’ असा होतो.) ही संकल्पना याचेच एक रूप. तसेच अ‍ॅडम स्मिथच्या स्वत:च स्वत:चे नियमन करणाऱ्या बाजारपेठेतला जो अदृश्य हात (Invisible Hand) आहे त्यामागचा विचारही हाच, की प्रत्येक माणूस हा स्वार्थी असून तो नेहमी स्वत:च्या फायद्याचीच गोष्ट करणार आणि फायदा नसेल तर तो त्यातून बाहेर पडेल; ज्याद्वारे बाजारपेठ स्वत:चे नियमन करू शकते. आयर्न रॅंड यांनी त्यांच्या ‘फाउंटनहेड’ या कादंबरीत व्यक्तिस्वातंत्र्याचं उत्तम समर्थन केलं आहे; जे ‘आपल्या’सारख्यांनी एकदा तरी वाचलं पाहिजे.

समाजाचा विचार करणारा समूहवाद ही डावी, तर व्यक्तिकेंद्रित व्यक्तिस्वातंत्र्यवाद ही उजवी विचारसरणी मानली जाते. या दोन्ही विचारसरणीचे काही फायदे आहेत, तर

काही तोटे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. अतिसमूहवादी विचारसरणीचे परिणाम म्हणजे फॅसिझम आणि त्यातून येणारी हुकूमशाही, साम्यवाद आणि त्यातून निर्माण होणारी दडपशाही आणि या सर्वातून समाजाच्या भल्याच्या नावाखाली होणारे समाजाचे आणि त्यातील माणसांचे शोषण. तर अति-व्यक्तिस्वातंत्र्यवाद हा अनागोंदी कारभाराला निमंत्रण देऊ शकतो. कोणताही हस्तक्षेप नाही, कायदे-नियम नाहीत आणि स्वार्थाला दिलेली सूट यामध्ये केवळ जे हा खेळ खेळायला शक्तिशाली, समर्थ आहेत, त्यांचाच फायदा होऊ शकतो. समाजातील दुर्बल घटकांची अवस्था शोचनीय होते. याचे उदाहरण म्हणजे अति-व्यक्तिस्वातंत्र्यवादामुळे कुटुंबसंस्थेवर परिणाम होतो आणि समाजातील वृद्धांचे प्रश्न निर्माण होतात. २००८ ची आíथक मंदी ही अशाच लाईझे-फेयर (Laissez-faire) धोरणांचा अतिरेक केल्याने आली असे मानले जाते. आणि हे धोरण राबविणारे अमेरिकन फेड रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष एलन ग्रीनस्पॅन हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यां आयर्न रॅंड यांचे विद्यार्थी होते, हा काही केवळ योगायोग नाही!

व्यक्तिवादी आणि समूहवादी विचारसरणी ही एखादी संस्कृती किंवा समाज समजावून घेण्याचा महत्त्वाचा पलू आहे. समाजातील लोकांचे एकमेकांसोबतचे संबंध आणि व्यवहार तसेच इतर समाजातील लोकांशी होणारे व्यवहार याबद्दल या संकल्पनेतून बरीच माहिती मिळते. वैयक्तिकरीत्या आपल्या विचारांवर कोणता प्रभाव आहे हे यातून दिसून येते. तसेच दोन्हीही विचारसरणी आपण समजावून घेतल्या तर त्यांचा एक वैचारिक साधन म्हणूनही आपल्याला वापर करता

येऊ शकतो. अगदी नेहमीच सुवर्णमध्य जरी नाही साधता आला, तरी काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी ‘मी’ आणि ‘आम्ही’मधला

समतोल राखण्याचा प्रयत्न आपण याद्वारे निश्चितच करू शकतो.

parag2211@gmail.com