‘‘आ त्या, मला असं विचारायचंय, की माझ्या सर्दीचा आणि शीतपेयांचा काय संबंध?’’
‘‘शीतपेयं तुम्ही ‘थंडच’ पिणार. हे सर्दीचं एक प्रमुख कारण. प्रत्येक बाटली गणिक पोटात साखर जाणार. आयुर्वेदाच्या मते, गोड चवीचे पदार्थ शरीरात कफाचीच निर्मिती जास्त करतात. या पेयांमधली प्रीझव्‍‌र्हेटिव्हज्, कृत्रिम रंग, कृत्रिम स्वाद अशा गोष्टीही अ‍ॅलर्जीजन्य सर्दी किंवा दम्याला कारण ठरू शकतात.’’
‘‘आपल्याला हे काहीच कसं माहीत नसतं?’’
‘‘का बरं? नेटवर सगळी माहीती मिळू शकते. तुम्ही सोईस्कर फक्त गोष्टीच वाचता, त्याला कोण काय करणार?’’
‘‘पाच महिने झाले आम्ही पितोय! नशीब, त्याचं व्यसन लागत नाही.’’
‘‘असं काही नाही बरं! काही शीतपेयं उत्तेजक असतात. त्यातल्या कॅफीनमुळं त्याचं व्यसनही लागू शकतं. कधीकधी मनोवृत्ती हिंसक बनते.’’
‘‘तिकडच्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी जे गोळीबार करतात, त्याचं कारण हे तर नसेल ना?’’
‘‘असूही शकेल. तू लॅन्सेट हे नाव ऐकलं आहेस का?’’
‘‘हो. प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक आहे ना ते?’’
‘‘हं. डिसेंबर २००० च्या लॅन्सेटच्या अंकात प्रसिद्ध झालेली एक घटना सांगते. एका १८ वर्षीय युवकानं एक दिवस २३्रे४’ंल्ल३ २ऋ३ १्रिल्ल‘२चे सलग तीन कॅन रिचवले. त्यानंतर म्हणे, बास्केट बॉल खेळताना त्याचा लगेच मृत्यू झाला. त्यावेळी आयरिश सरकारनं या बाबीची गंभीरपणे दखल घेऊन, चौकशी करण्याचे आदेश दिले होते.’’
‘‘तीन कॅनमध्ये थेट यमराजांनाच आमंत्रण? कसं शक्य आहे?’’
‘‘आपल्याकडेही दिल्ली, अहमदाबाद अशा काही ठिकाणी पैज लावून विद्यार्थानी शीतपेयांचं (उत्तेजक नसलेल्या.. हं) अतिसेवन केल्यामुळं काही जणांचे मृत्यू होण्याचे प्रकार घडले आहेत.’’
‘‘असं असेल तर या पेयांवर बंदी घालायला हवी सरकारनं.’’
‘‘बंदी कशी घालतील? या सगळय़ा पाठीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आर्थिक राजकारण आहे. उलट या सगळय़ा श्रीमंत कंपन्यांच्या दबावामुळं, आपल्या देशात त्यांना वीज, दळणवळण, भांडवल, कर अशा सगळय़ा गोष्टींसाठी सवलती दिल्या जातात. भूगर्भातलं पाणी या कंपन्या फुकट वापरतात आणि लाखो वर्षांचा, जमिनीच्या पोटातला पाण्याचा साठा भसाभसा संपवतात.’’
‘‘त्यांच्या कारखान्याचं, निस्तरता न येण्यासारखं प्रदूषणही असेलच की!’’
‘‘हो. प्लॅस्टिकचा कचरा, हवा-पाणी-जमीन यात मिसळली जाणारी भयंकर रसायनं, बाटल्या धुण्यासाठी वापरला जाणारा साबण हे कालांतरानं घातक ठरणारच आहे. पण आता ही पेयं माझ्या देशाच्या तरुण पिढीच्या स्वास्थ्याचा घास होताहेत, हेही जास्त वाईट आहे.’’
‘‘अगं, मग पाश्चात्त्य देशांत यावर बंदी कशी नाही आली अजून?’’
‘‘ते सत्याचे पुजारी आहेत, हा आपल्याकडचा गैरसमज आहे. त्यांच्याकडे बंदी नाही यापाठीमागेही ‘आर्थिक राज (हेच) कारण’! या व्यवसायात मोठमोठय़ा उद्योजकांनी केलेल्या प्रचंड गुंतवणुकीपायी, शीतपेयांविरुद्धचे काही अहवाल, अमेरिकेसारख्या देशांतही प्रकाशित केले गेले नाहीत. तरी एक बरं आहे तिथल्या शाळा-महाविद्यालयांमधल्या कॅन्टिन्समध्ये शीतपेये विक्रीवर र्निबध आहेत. ते जपतात आपल्या मुलांना.’’
‘‘पण तिथल्याही मुलांना या पेयांचं आकर्षण असेलच की?’’
‘‘आकर्षण वाटण्याचं आणि वाढण्याचं काम जाहिराती करतात. तिथे सरकारचा असा आदेश आहे की, शीतपेयांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी लहान मुले किंवा तरुण यांना भुलवणाऱ्या जाहिराती करू नयेत.’’
‘‘आपले क्रिकेटपटू आणि अभिनेते सर्रास जाहिराती करत असतात की या शीतपेयांच्या!’’
‘‘त्यांना त्याचे कोटय़वधी रुपये मिळतात रे! आणि दुर्दैवानं तेच तुमचे आयडॉल. ते दिसले, की आपली जनता-स्वत:च्या खांद्याच्या वर काही एक अवयव आहे आणि तो देवानं उत्तम उपयोगासाठी दिला आहे हेही विसरते. सगळय़ा मेंढय़ा हुरळतात आणि लागतात लांडग्यांच्या मागे.’’
‘‘आपलं सरकार का नाही असे नियम बनवत?’’
‘‘आपल्या सरकारबद्दल काही न बोललेलंच बरं. पण अमेरिकेत सरकारी नियमांची गरज जास्त आहे. कारण तिथे कुटुंबव्यवस्था नाही. आईवडील मुलांच्या जवळ असतातच कुठे? आपली कुटुंबव्यवस्था अजूनही दणकट आहे. आजी, आजोबा, आई, बाबा, मामा, मावशी सगळे असतात सांगायला. पण आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. आमचा जाहिरातीतल्या उपटसुंभ माणसांवर!’’  
‘‘आत्या, हा तू तरुणांवर सरळ सरळ आरोप करते आहेस.’’
‘‘खोटा नाही ना? तूच बघ हं.‘आमचं शीतपेय प्या’ हे सांगणारी कंपनीची जाहिरात असते ३० ते ४० सेकंदाची. का प्या, गरज काय, फायदे काय, किती पौष्टिक असं कुठलंही शास्त्रीय निरूपण त्यात नसतं. तुम्हालाही त्यांच्यापुढे असे प्रश्न सुचत नाहीत. उलट ‘नको रे राजा पिऊस ते.’ हे कळकळीनं सांगणाऱ्या पालकांना तुम्ही शेकडो प्रश्न विचारता. वर त्यांचं ऐकत नाही ते नाहीच.’’
‘‘अगं, तूं बघ त्या जाहिराती. खरंच आकर्षक असतात.’’
‘‘असणारच! जाहिराती बनवणारी जी टीम असते ना, त्यात एक मानसशास्त्र तज्ज्ञही असतो. तरुणांच्या मनाचा झटक्यात कब्जा घेण्यासाठी जाहिरात काय असायला हवं, हे तो सांगतो म्हणे.’’
‘‘आईशप्पथ! हे तरुणांविरुद्ध एक प्रकारचं छुपं षड्यंत्रच झालं की! असं कसं करू शकतात ही माणसं?’’
‘‘त्यांना नावं नाही ठेवू शकत आपण. ते पैसे घेऊन स्वत:चं काम चोख करतात. पण आम्ही शिकलेले, विज्ञाननिष्ठ, विवेकवादी ना? आमचं डोकं नको का चालायला? आम्ही विचार करायला हवा. नाहीतर शिक्षणाचा काय उपयोग?’’
‘‘खरंच इतका विचार नाही केला कधी. मस्त लागतं, स्वस्त मिळतं म्हणून पितो.’’
‘‘स्वस्त??अरे, अशा कोटय़वधी बाटल्या स्वस्तात विकून, या कंपनी इथून कित्येक हजार कोटी डॉलर्सचा नफा त्यांच्या देशात नेतात. या पैशांचाही वापरही पुन्हा आपल्याच देशाविरुद्ध केला जात नसेल कशावरून?’’
‘‘मुळात ही शीतपेयांची संकल्पना आली कशी?’’
‘‘पाश्चात्त्य देशांचं तुम्हाला आता दिसणारं विकसित स्वरूप हे तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं आहे. मुळात या देशांमध्ये पिण्याच्या लायकीचं पाणी सर्वत्र, सुलभ आणि सर्वकाळ उपलब्ध नाही. त्याला त्यांनी हे पर्याय आणलेत फळांचे रस, मद्य, शीतपेय, बाटलीबंद पाणी.’’
‘‘पिण्याच्या पाण्याची समस्या तर आपल्याही देशात आहे.’’
‘‘निसर्गत: नाही. आपल्या देशाला ‘सुजलाम’ म्हटलं आहे, ते उगीच नाही काही! आपल्याकडचे जमिनीवरचे आणि जमिनीखालचे पाण्याचे स्रोत ९०% पेक्षा जास्त प्रमाणात पिण्याच्या योग्यतेचे आहेत. त्याचं प्रदूषण, विहिरी आटणं ही माणसाची कर्तबगारी. या इथल्या नैसर्गिक समस्या नव्हेत. म्हणून तर आपल्याला असे पर्याय शोधण्याची गरज कधीच लागली नाही.’’
‘‘या सगळ्याचा आरोग्याशी काय संबंध?’’
‘‘नाही कसा? पाणी-हवा-जमीन यांचं प्रदूषण, देशातली गंगाजळी परदेशात जाण्यामुळं इथे निर्माण होणारं दारिद्रय़, परदेशी पैशावर पोसला जाणारा या देशातला दहशतवाद, हे सगळे घटक माझ्या देशबांधवांच्या कौटुंबिक, सामाजिक, मानसिक आणि प्रसंगी शारीरिक अनारोग्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कारण ठरताहेत. एक वैद्य या नात्यानं या घटकांचा विचार करून लोकांचं प्रबोधन करणं हे मी करायलाच हवं, नाही का?’’

‘‘म्हणजे आम्ही या अराजकाला हातभार लावतो, असं म्हणावं लागेल. तू एकदम तीक्ष्ण अंजन घातलंस की डोळय़ात. पण मित्र ऐकत नाहीत गं.’’
‘‘त्यांना समजवण्यासाठी तू तुझे कौशल्य वापर. मुद्दे पुरवलेत तुला मी भरपूर.’’
‘‘आत्या, कधीतरी दोन-चार महिन्यांतून एकदा चालेल ना प्यायलेलं?’’
‘‘आग आहे, हात लावलास तर भाजेल- असं मी स्पष्ट सांगतेय. आता कधीतरी हात लावून बघणाऱ्याला आग भाजत नाही-असा काही अलीकडचा नियम असेल, तर मला माहीत नाही बाबा!’’
‘‘आजोबा म्हणतात तेच खरं. तू सगळं उत्तर देतच नाहीस. आणि तरी निरुत्तर करतेस. आजपासून मी शीतपेयं सोडली.’’
‘‘म्हणजे तुझे प्रश्न संपले तर! उत्तम!’’
‘‘हो. आणि आत्या.. आय लव्ह यू’’
‘‘ क ’५ी ८४ ३ आय लव्ह यू टू.. बेटा.’’