‘लोकरंग’मधील (२९ ऑक्टोबर) ‘कार्यरत चिमुकले’ सदरातील अदिती देवधर यांचा ‘कचऱ्याचं गणित!’ हा लेख मुलांनीच नव्हे तर मोठ्यांनीही वाचायलाच हवा असा आहे. साधा पेपर कप त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून, हा कप बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्यात होणारे निसर्गाचे नुकसान, प्लास्टिकचा वाढता कचरा आता मोठे प्रश्न निर्माण करीत आहे. मानवी रक्तात मायक्रो प्लास्टिक सापडत असून, आता कचरा कमी कसा करायचा यासाठी व्यापक उपाययोजना व वैयक्तिक पातळीवर जागरूकता आवश्यक आहे. नाशिकला नाशिक प्लॉगर्स ही पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था (संस्थापक तेजस तलवारे, प्रेसिडेंट दीप्ती कराडे) असून या संस्थेचे स्वयंसेवक सुट्टीच्या दिवशी अनेक परिसरात जाऊन विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या जमा करून विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडे दिल्या जातात. निसर्गातील प्लास्टिक कचरा- ज्याचे विघटन होत नाही त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-प्रफुल्लचंद्र काळे

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

महत्त्वाचे विचारवंत

‘लोकरंग’मधील (२९ ऑक्टोबर) ‘ऱ्हासमय काळातील रसरशीत नऊ दशके’ हा अजित रानडे यांचा लेख वाचला. जागतिक पातळीवर विचारांना वेगळी दिशा देवून नवीन व मूलभूत मांडणी करणाऱ्या व्यक्तींना ‘विचारवंत’ असं संबोधन लाभतं, (एखादी उत्तम संज्ञा वा संकल्पना निघते आणि मग तिचा नको तिथे, नको तसा आणि नको तितका वापर सुरू होतो. गैरवापराने सत्यानाश व विद्रूपीकरण झालेल्या अनेक संज्ञांपैकी ही एक!) अमर्त्य सेन हे त्यांपैकी एक विचारवंत! गेली तीन दशके जगातील निवडक दहा विचारवंतांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. जागतिक समस्यांवरील त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी आज अवघे जग सदैव सज्ज असते.

अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय- सेन यांचे मत अनिवार्य असते. ‘‘तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, अशा बहुविध अंगांनी अर्थशास्त्राचा अन्वय लावणारे अमर्त्य यांच्यासारखे तत्त्वज्ञ व भाष्यकार अतिशय दुर्मीळ असतात,’’ असे नोबेल सन्मानित जोसेफ स्टिगलिट्झ म्हणतात. पॉल गमन, अ‍ॅयग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अ‍ॅटिक्सन हे अर्थवेत्ते ‘आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ, हे मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय’ अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात. खुद्द गुरुदेव रवींद्रनाथ यांनी दिलेले ‘अमर्त्य’ हे नाव डॉ. सेन यांनी सार्थ केले आहे. दुष्काळ, सामूहिक निवड आणि मानव विकास हे त्यांचे आवडते विषय. अमर्त्य सेन यांच्या ‘द आग्र्युमेंटेटिव्ह इंडियन’ या पुस्तकात त्यांनी प्राचीन काळापासून भारतीय उपखंडात असलेल्या वादसंवाद परंपरेचे वर्णन केलेलं आहे.

-प्रकाश पोले, कसबा पेठ, पुणे</strong>

lokrang@expressindia.com