|| अरुंधती देवस्थळे

अरुंधती देवस्थळे… इंग्लिश आणि अमेरिकन तौलनिक साहित्याच्या अभ्यासक. प्रकाशन व्यवसायात सरकारी, कॉर्पोरेट आणि डेव्हलपमेंट क्षेत्रांत कार्यानुभव. युनेस्कोच्या दोन प्रकल्पांत काम. बहुराष्ट्रीय प्रकाशन संस्थांमध्ये काम केल्याने अनेक देशांत भ्रमंती. कला आणि बालसाहित्यातील शोधकार्यासाठी युनिव्हर्सिटीज्च्या फेलोशिप्स. इंग्रजी, हिंदी आणि मराठीत लेखन व अनुवाद. सध्या हिमालयातील एका खेड्यात वाचनालयांचे नेटवर्क चालवत साक्षरतेचे कार्य करतात.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

आपणा सगळ्यांची एक बकेट लिस्ट असते. एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात कुठला अनुभव आपण अगदी घ्यायचाच हे ठरवून, स्वत:ला कबूल केलेली! उत्कट स्वप्नांचे रोडमॅप्स शोधून ठेवायचे असतात, कारण सहजसाध्य नसतंच काही. प्रेम आणि कलेचं प्रतीक असलेलं पॅरिस खूप काही ऐकल्या-वाचल्यामुळे बघणं अनेकांच्या संकल्पात असतं. पॅरिसमध्ये दाखवलं जातं त्यातलं एखाद् दुसरं  स्थळ पाहून घ्यावं… पण हे शहर  पायी भटकत आपल्या आत उतरवून घ्यायची चीज आहे. अनेक जण पर्यटन कंपन्यांबरोबर पॅरिसयात्रा करतात. ते लोकांना शांजेलिजेमधली खरेदीची दुकानं, डिस्नी लँड वगैरे दाखवू पाहतात. पण बाकी सगळं विसरून जगातल्या सर्वोत्कृष्ट कलासंग्रहालयात- म्हणजे लूव्रमध्ये दिवस घालवावा… ते पाहिल्यावर  इथली बाकी प्रेक्षणीय स्थळं न पाहिली तरी काही बिघडत नाही. काही अनुभव ‘उरकून टाकण्यासाठी’ नसतातच घ्यायचे. डॉम पेरीयॉनचा एक ग्लास की मर्लोचे चार, हा निर्णय काहींसाठी सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो… काहींना तो सुजाणपणे करावा लागतो. हे  सदर लेखिकेच्या वाट्याला आलेल्या लूव्रचे ‘गुण गाईन आवडी’ म्हणून सुरू होतेय. मॉनेंची गिव्हर्नी, वेनिस त्रिनाले, कांदिंस्की आणि गॅब्रिएला मुन्टर यांचं नातं आणि म्युझिअम झालेलं घर, पिकासोच्या बायकोशी  स्टुडिओत भेट…  हा प्रत्येक अनुभव या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करण्यालायक! आयुष्यातल्या तमाम बऱ्या-वाईटाचा विसर  पाडून फक्त सृजनशीलतेच्या सोहोळ्यात वेधून टाकणारी ही सौंदर्ययात्रा अनुभवण्याची संधी प्रत्येक रसिकाला मिळावी, एवढंच!

एकंदरीत काय, फ्रान्सच्या राजघराण्याच्या कलेच्या खजिन्यात नेपोलिअनने घसघशीत भर घातली. त्याची पत्नी जोसेफाईन त्याच्यासारखीच कलाप्रेमी. संग्रहालयात येणारी प्रत्येक कलाकृती प्रथम तिच्या अभिप्रायार्थ सादर होई. पॅरिसला जगाच्या कलेची राजधानी करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या नेपोलिअनच्या राज्याभिषेकाचं ‘कॉरोनेशन ऑफ नेपोलिअन’ हे दरबाराची शान चित्रित करणारं जॅक्वे-लुई डेविडने चितारलेलं ६.२१ ७ ७.९ मीटर्सचं भव्य तैलचित्र (ऑइल ऑन कॅनव्हास) लूव्रमध्ये अभिमानाने झळकत आहे. सोनेरी वेशातले राजाचे धर्मगुरू, मोठ्ठा क्रूस, राजदंड, लाल सोनेरी कपड्यांतील दरबारी, शुभ्रवस्त्रा शेलाटी जोसेफाईन त्याला अभिवादन करताना दिसते. मोजक्याच उच्च घराण्यांतल्या स्त्रिया आणि मागे असलेल्या ऑर्गनची भव्यता… इतिहास माहीत असलेल्यांना या चित्रासमोर उभं राहिलं की आपोआपच दृश्याच्या कल्पनेबरोबर ऑर्गनचे गंभीर, पराक्रमी राजाचा आब दाखवणारे सूर ऐकू येतात.

नेपोलिअन इटलीनंतर इजिप्तकडे वळला. ही संस्कृती आणि शैली त्याला नवी होती. अनेक चित्रबोलींतले (हाइरोग्लिफ्स) सुंदर नमुने आणि कलापूर्ण पुरातन वस्तू (अँटिक्विटीज) आधी व्यवस्थित समजून घेतले आणि शेकडोंनी घेऊन आला. ही लिपी दगड, धातू किंवा लाकडावर कोरीवकामातून गूढ, सूचक माध्यमातून इजिप्शियन पुराणकथांतून मिळणारे धार्मिक संदेश देणारी. त्यानंतरही जुन्यापुराण्या कलात्मक वस्तू लूव्रमध्ये येतच राहिल्या आणि त्यांचं एक स्वतंत्र दालनच बनवण्यात आलं. आजचा लूव्रमधला जो इजिप्शियन कलावस्तूंचा खजिना आहे, त्याची बरोबरी फक्त मूळ देशातील खजिन्याशी होऊ शकते असं बोललं जातं. इजिप्शियन दालनात प्रवेशद्वाराशीच गुलाबी ग्रॅनाईटचा स्फिन्क्स भेटतो. ठिकठिकाणी दगडावर कोरलेली चित्रलिपी फक्त लालसर तपकिरी, पिवळा गेरू रंग, काळा आणि पांढरा या चारच रंगांचा सुंदर खेळ. त्यात बहुतेक कमरेवरील शरीरं अनावृत आणि कटिवस्त्र सफेद. लक्षात राहते ती तरुण राजकन्येची ममी आणि तिचे जाडजूड सोन्याचे दागिने. कलावस्तूंमध्ये १५०० बी. सी.च्या सुमाराची लाकडी निळ्या पायांची खुर्ची, विणलेली सीट आणि मजबूत दिसणारी लाकडी पाठ आणि समोरचा खेळाचा सारीपाट. इजिप्तमधून आणलेलं दुसऱ्या शतकातलं ‘पोट्र्रेट ऑफ ए वूमन’ ही दहा वेगवेगळ्या रंगांतल्या चौकोनांची  बनलेली लाकडावरची प्रतिमाही आहे. अनेक मीडियम्स आणि शैलींचा संगम एकाच वेळी शांत आणि नाटकीय! त्या काळात असं काही निर्मिणारं कोणीतरी होतं हेच स्तिमित करणारं. नेपोलिअनच्या या अतिशयच समृद्ध खजिना जोडण्यामुळे ‘लूव्र’ला पूर्वी ‘म्युझी नेपोलिअन’ हे नाव देण्यात आलं होतं. ते त्याकाळी योग्यच होतं. पण पुढे या खजिन्यात चौफेर भर पडणार होती… पडतच राहणार होती़… सांभाळणंच अशक्य होईपर्यंत. 

पहिल्या मजल्यावर रिशलियू विंगमध्ये एका दालनात नेपोलिअनचं ‘ग्रँड सलों’ आहे- त्याच्या मानमरातबाला शोभेलसं. त्यात त्याची प्रिय  पेटिंग्ज, राजघराण्यातल्या स्त्रियांची तैलचित्रं (गोडसा चेहरा असलेल्या डौलदार जोसेफाईनचं चित्र उत्सुकतामिश्रित बारकाईने न्याहाळलं जातं. हे चित्र तिला समोर बसवून काढलेलं असणार.), अगदी कोपऱ्यातसुद्धा उंच, कमनीय पुतळे… सगळा राजेशाही थाटमाट. सोनेरी आणि लाल रंगाचं आधिपत्य. जगज्जेत्याचा लांब, लाल भरजरी पोशाख, संगमरवरी भिंतींवरही सोनेरी कोरीव वेलबुट्टी, वैभवशाली झुंबरं, पांढरे आणि सोनेरी उंची गालिचे, शेजारीच त्याचं भोजनगृह, सोनेरी नक्षीकामाची भांडी. पण नंतर एका क्षणी हे वैभव अंगावर आल्यासारखं वाटू शकतं आणि आपण लूव्रमध्ये प्रथमच वळून न बघता पुढे जातो. डेनॉन विंगच्या पहिल्या मजल्यावरील पाच प्रशस्त दालनांत १९व्या शतकातील मोठ्ठ्या आकाराची फ्रेंच आणि इटालियन चित्रकारांची चित्रं आहेत. त्यांना गंभीर, राजसी लाल रंगाची पाश्र्वभूमी. एक महत्त्वाचं  पेटिंग म्हणजे यूजीन डेलेक्रोयचं ऑइल ऑन  कॅनवास : ‘लिबर्टी र्लींडग दि पीपल.’ १८३० मधलं हे चित्र आकाराने भव्य फलकासारखं आहेच; शिवाय अजोड ऐतिहासिक महत्त्वाचंही! रक्तरंजित फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या जुलै क्रांतीत जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाचं हे चित्ररूप आहे असं मानतात. पिवळसर अनावृत छातीच्या पिवळसर झग्यातल्या स्वातंत्र्यदेवतेने (मरिआन) नागरिकांचं नेतृत्व करणारा निळा, श्वेत आणि लाल रंगाचा राष्ट्रध्वज एका हातात धरला आहे आणि दुसऱ्या हाती शस्त्र आहे… लढ्याचं प्रतीक! मरिआनची देहबोली एका जोशपूर्ण योद्ध्याची. जवळ दोन रगेलेसे स्वातंत्र्यसैनिक आहेत. मूल्यांसाठी क्रांती लहानथोरांना प्रेरित करणारी असं त्यातून ध्वनित करायचं असावं. समोर पेहरावावरून सामंतवादी वाटणारे शत्रू- शस्त्र उगारून तिच्या आमनेसामने. कौशल्यपूर्ण कंपोझिशनमुळे तेजस्वी भासणाऱ्या स्वातंत्र्यदेवतेचं अस्तित्व इतर सगळं निष्प्रभ करणारं!

मोनालिसाच्या समोरच्याच भिंतीवर असलेलं पाउलो वेरोनीचं ‘वेर्डिंग अ‍ॅट काना’ हे भलंथोरलं पेटिंग नेपोलिअनने इटलीतून जिंकून आणलं. ऑइल  ऑन  कॅनव्हास  माध्यमातलं.  ९.९४ ७ ६. ७७ मीटर्समध्ये बद्ध भव्यता! रंगीबेरंगी डिर्टेंलग असणारं हे चित्र खरं तर एका निबंधाचा ऐवज. बायबलमधल्या कथेची पाश्र्वभूमी. एका प्रशस्त मठाच्या प्रांगणात उघड्या, निळ्या, शांत आकाशाखाली खास मेजवानीसाठी जमलेले धार्मिक पुरुष. मागे चर्चचा मनोरा. काही कठड्यांवर रेलून दृश्य बघताहेत. त्यांची देहबोली सांभाळत नाजूक बारकावे छान टिपलेले. हे  पेटिंग बनवायला त्या थोर चित्रकाराला सव्वा वर्ष लागलं होतं… मेहनतीचा हिशोब न मांडणंच बरं. ‘एनटूम्बमेन्ट ऑफ ख्राइस्ट’- १.४८ ७ २.१२ मीटर्समधलं ऑइल ऑन कॅनव्हास. राखाडी रंगाच्या विविध छटा, काळा आणि फिकट पिवळ्या रंगाचा अतिशय बोल्ड स्ट्रोक्समध्ये प्रभावी वापर. वातावरणात भरून असलेला मूक शोक व्यक्त करणारा. चित्रातल्या दोन्ही स्त्रियांची देहबोली आणि अधोमुखीच्या वस्त्राला पडलेल्या चुण्या हीसुद्धा कौशल्याची साक्ष! पाठमोऱ्या एका दफनकत्र्याने घातलेला विझत्या र्नांरगी रंगाचा ढिला कोट, राखाडी-काळ्या पाश्र्वभूमीला रंगाच्या तबियतीमुळे एक गहिरं परिमाण देणारा. त्या र्नांरगी कोटाच्या गळ्याशी मळकट पांढऱ्यावर काळ्या चौकडीचा स्कार्फ… टिईशनची काम्पोझिशन आणि रंगसंगतीची योजना केवळ डोळ्यांचं पारणं फेडणारी.

आणखीन एक सांगायला हवं : जर क्लॉद मॉने, पिएर-आगुस्त रेनूआ, वान गॉग, कामिल पिसारो, सेझाँसारखे अनेकांच्या मनावर राज्य करणारे इम्प्रेशनिस्ट्स आणि पोस्टइम्प्रेशनिस्ट किंवा वासिली  कादिंस्की, मार्क रॉथको, ब्रांकुसी, हेन्री मूर यांसारखे अलीकडचे दिग्गज शोधत असाल तर ते इथे नाहीत… म्हणजे त्यांची गाजलेली चित्रं, शिल्पं नाही भेटायची. (ब्रांकुसी अबूधाबीच्या लूव्रमध्ये आहे म्हणतात.) मॉनेची जलरंगातली ‘दि टर्कीर’ किंवा ‘निम्फ्स’ भेटतात, पण ती फक्त हजेरी लावल्यासारखी. देगाचीसुद्धा चित्रं नाहीत इथे… जरी त्याने काढलेलं ‘दि पेंटर अ‍ॅट लूव्र’ प्रसिद्ध असलं तरी. फ्लेमिश आणि डच चित्रकार मात्र बरेच आहेत. रेम्ब्रां, व्हर्मिर, पीटर पॉल रुबेन्स आणि अँथोनी वान डाइक यांची अतिशय सूक्ष्म बारकावे टिपणारी बरोख शैली हा एक अनुभवच. या उच्चकोटीच्या कलाकारांची चित्रं आकाराने लहान. त्यात इटालियन किंवा फ्रेंच भव्यता नाही. पण किरमिजी, निळ्या, लाल आणि तपकिरी रंगांच्या छटांतून निर्माण केलेली खोली हे एक वेगळंच परिमाण त्यात आढळतं.

व्हर्मिरची ‘मिल्कमेडर’ किंवा ‘मेड विथ दि पर्ल इर्अंरग’ गाजलेल्या. इथे त्यांची आठवण करून देणारी ९.५’’ ७ ८. ३’’ मधली उपकरणावर झुकलेली नवतरुणी ‘लेस मेकर’ (१६७०), तिचा तो सफेद कॉलरवाला पिवळा झगा आणि त्याच्या नेहमीच्या निळ्या रंगाची जादू पाहणाऱ्याला खिळवून ठेवते! रेनासाँपूर्व तेराव्या- चौदाव्या शतकातले ज्योटो (‘सेंट फ्रान्सिस रिर्सींवग दि स्टिग्माटा’) आणि नंतरचे कार्वाजिओ (‘दि डेथ ऑफ वर्जिन मेरी’ आणि ‘दि फॉच्र्यून टेलर’), राफाएल (‘स्मॉल होली फॅमिली’), उचॅल्लो (‘सां रोमानो बॅटल’), बॉटचेल्ली (‘व्हीनस अँड थ्री ग्रेसेस’, ‘मॅडोना अँड चाइल्ड अँड यंग सेंट जॉन दी बॅप्टिस्ट’) यांसारखे इटालियन आणि फ्रेंच दिग्गज इथेच एकत्र पाहण्याची संधी मिळते.            

(क्रमश:)

arundhati.deosthale@gmail.com