‘कर्णबधिरांच्या विश्वात’ या पुस्तकाच्या लेखिका समाजसेविका उषा धर्माधिकारी यांनी अनेक वर्षे लोकमान्य टिळक रुग्णालयातील बहिऱ्या मुलांची शाळा, डेफ युथ फाऊंडेशन, डेफ अ‍ॅक्शन ग्रुप आणि संजीवन दीप अशा विविध संस्थांच्या माध्यमातून कर्णबधिरतेच्या क्षेत्रात काम केले आहे. या कामाचा गाठीशी असलेला प्रदीर्घ अनुभव म्हणजे हे पुस्तक होय. ‘कर्णबधिरांच्या घरात’ या विभागात त्यांनी ज्या घरांत कर्णबधिर मुलं आहेत त्यांच्या पालकांचे अनुभव, त्यांचे संघर्ष, काहींनी या अनुभवांतून जपलेला समाजकार्याचा वसा अशा अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. त्या वाचकाला खूप काही शिकवून जातात. त्यातून कर्णबधिरांकडे बघण्याचा वाचकाचा दृष्टिकोण बदलतो. त्याचप्रमाणे कर्णबधिरांचे विवाह, त्यांचे विवाहपूर्व मेळावे, विवाहात येणाऱ्या समस्या यांविषयीही यात वाचायला मिळते. कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि समाजसेवकांची माहिती या विभागात आहे. कर्णबधिरांना घेऊन नाटकं, नृत्य करण्याचा विलक्षण अनुभव वाचकाला चकित करून जातो. कर्णबधिरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही या पुस्तकात दिलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्णबधिरांच्या विश्वात’ – उषा धर्माधिकारी, ग्रंथाली प्रकाशन, पाने- १६३, किंमत- २५० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review karnabadhiranchya vishavat book by author usha dharmadhikari zws
First published on: 06-11-2022 at 01:21 IST