प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

‘नोकरी प्रत्येकालाच हवी असते, पण काम कोणालाच करायचं नसतं!’ अशा आशयाचं एक गमतीशीर वाक्य मध्यंतरी वाचनात आलं होतं. म्हणजे नोकरी मिळावी म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, मुलाखती, कधी कधी वशिलेबाजी, तडजोड  इत्यादी अडथळे पार करून नोकरी मिळाली की मग मात्र माणसाच्या मनात वेगवेगळे विचार हळूहळू स्थिरावू लागतात आणि तो निवांत नोकरदार होऊन जातो. नोकरी मिळवण्यासाठी धडपड  करणाऱ्या  या उत्साही माणसाचं रूपांतर अचानकपणे स्थितीप्रिय मध्यमवर्गीय माणसांमध्ये होऊन जातं, असं निरीक्षण त्या लेखात मांडलं होतं. अर्थातच असं चित्र सरकारी-निमसरकारी कार्यालये, बँका किं वा पब्लिक सेक्टर वगैरेंमध्ये आपण पाहतोच. त्याला अपवादही असतातच. पण मुद्दा तो नाही. या नोकरी मिळवून ऑफिसमध्ये गेलेल्या व्यक्तीचं जग एकदम वेगळं होऊन जातं. निव्वळ सुरक्षित नव्हे तर सुखासीन  होऊन जातं आणि ते पुढे पुढे इतकं सुखासीन होतं की कामाचाच तिटकारा वाटू लागतो. अर्थातच हा आश्चर्यकारक बदल घडायला पंचवीस-तीस वर्षे लागतात. असो.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

तर या सगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या स्थित्यंतराचा आणि मानसिक स्थितीचा आढावा अनेक व्यंगचित्रकारांनी मोठय़ा खुबीनं मांडला आहे. ऑफिसचे कर्मचारी, बॉस, सेक्रेटरी, फोन, टायपिंग, फाइल्स, चहा, सुट्टय़ा, गप्पा आणि मुख्यत्वेपणे पगार यांबाबतचे प्रसंग किंवा वातावरण आपल्या परिचयाचं असलं तरी विनोद किंवा भाष्य ताजं आहे. या सगळ्या विषयांभोवती फिरत एक वेगळंच जग व्यंगचित्रकारांनी वाचकांना दाखवलं आहे.

याची काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. अचानकपणे एक कर्मचारी ऑफिसला वेळेत येऊ लागल्यानं बॉस त्याला  डिवचून  म्हणतो, ‘‘अरे बापरे, तुझी पगारवाढीची वेळ आली वाटतं!’’

आजारी बॉसला भेटायला त्याच्या घरी  गेलेल्या कर्मचाऱ्याला बॉस म्हणतो, ‘‘ऑफिसच्या वेळेशिवाय आला असतास तर जास्त बरं झालं असतं.’’

महत्त्वाचा कागद ऐनवेळी न सापडणं हा तर प्रत्येक ऑफिसचा गुणधर्म असावा. अशा वेळी चिडलेल्या बॉसवर त्याची सेक्रेटरी उलट म्हणते, ‘‘फाइल करायला सांगितलं होतं सर.. पण ते लक्षात ठेव असं कुठे सांगितलं होतं?’’

प्रत्येक ऑफिसमध्ये काम करणाऱ्याला भरपूर काम असतं. अशा वेळी भरपूर फायलींमध्ये डोकं घालून बसलेल्याला दुसरा रिकामटेकडा म्हणतो,

‘‘बरं झालं मला पगारवाढ मिळाली नाही ते!’’

एका चित्रात दोन कर्मचारी बारमध्ये बसलेले दाखवले आहेत. त्यातील एक जण आपलं दु:ख सांगतोय, ‘‘घरी बायको म्हणते, ‘ऑफिसचं काम घरी आणायचं नाही’ आणि बॉस म्हणतो, ‘घरच्या भानगडी ऑफिसमध्ये आणायच्या नाहीत’, म्हणून मग इथे यावं लागतं!’’

भरपूर पगार म्हणजे भरपूर काम आणि भरपूर पैसे म्हणजे साहजिकच भरपूर जबाबदारी. या सगळ्यांचं प्रेशर असलेला एक कर्मचारी डॉक्टरकडे जातो. त्याला तपासल्यावर डॉक्टर म्हणतात, ‘‘तुम्हाला हाय इन्कम प्रेशर आहे!’’ (आभार : दि फनी साइड ऑफ दि स्ट्रीट )

पण कधी कधी कर्मचारी या कामांमध्ये इतके गुंततात की त्यातून त्यांचं आयुष्यच संकटात सापडतं. काही वेळेस ऑफिसमध्ये केबिनवरून खूप मारामाऱ्या होतात. केबिनचा आकार, रचना आणि ती कुठे आहे यावर प्रतिष्ठा ठरू लागते. मोठी खिडकी हवी अशीही काहींची मागणी असते. असाच एक हाय प्रेशर ऑफिसर कामातल्या नैराश्याने खिडकीतून उडी मारण्याच्या बेतात असताना त्याचा बॉस त्याला म्हणतो,

‘‘अरे, आम्ही  खिडकीवाली केबिन तुला दिली, याची तू अशी परतफेड करतोस?’’ (आभार : प्लेबॉय)

कंपनीचा कारभार वाईट होत चालल्यानं कंपनीचा मालक आत्महत्या करण्याच्या बेतात असल्याचं  एका चित्रात दाखवलं आहे. पण लिहिण्याची सवय नसल्यानं तो सेक्रेटरीला बोलावून डिक्टेशन देतोय-‘‘एक सुसाइड नोट लिहा.’’

एका चित्रात एक नवीन स्टेनो बॉसला सांगते, ‘‘तुमचं सगळं लेटर मी शॉर्टहॅण्डमध्ये लिहून घेतलंय. फक्त त्यातलं ‘डिअर सर’ आणि  ‘युवर्स फेथफुली’ यांमधला मजकूर जरा पुन्हा एकदा सांगा.’’

एका परफ्युम बनवणाऱ्या कंपनीमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराला मुलाखत घेणारा ऑफिसर सांगतोय, ‘‘इथे तुम्हाला पगार, सुटय़ा, बाकीचे भत्ते वगैरे मिळतीलच; पण मुख्य म्हणजे संध्याकाळी ऑफिसबाहेर पडताना तुम्ही सेंट मारल्याप्रमाणे फ्रेश असाल.’’

गप्पा मारणं हा नोकरदारांचा जरा जास्तीच आवडीचा छंद! यावरचं हे चित्र फारच गमतीशीर आहे. वॉटरकुलरजवळ दोन कर्मचारी महिला पाणी पिता पिता गप्पा मारत आहेत.. बराच वेळ. नंतर त्यातली एक म्हणते, ‘‘बराच वेळ आपण इथे गप्पा मारतोय. पण मला वाटतं, आता आपण आपल्या जागेवर परत जाऊन शब्दकोडी सोडवू या.’’ (आभार : फनी बिझिनेस )

टेलिफोन ऑपरेटर हा ऑफिसमधला एक महत्त्वाचा घटक. एका कंपनीचं नाव ‘जोन्स, जोन्स, जोन्स आणि जोन्स’ असं असतं. तर त्यांची  टेलिफोन ऑपरेटर फोनवर विचारतेय, ‘‘तुम्हाला कोणत्या जोन्सशी बोलायचंय? ढेरपोटय़ा, टकलू, सिगारेटवाले की खेकसणारे?’’

बॉस आणि त्याची पर्सनल सेक्रेटरी या विषयावर जगभर  केवळ भरपूर चित्रंच नव्हे, तर असंख्य ढडउङएळ इडडङ आकाराचे  संग्रह आहेत. यात बहुसंख्य व्यंगचित्रं ही श्रीमंत बॉस आणि चंट सेक्रेटरी यांच्यामधल्या चावट संबंधांवर गमतीशीर, मिश्कील टिप्पणी करणारी आहेत. पण पर्सनल सेक्रेटरी नेमण्याचा एक महत्त्वाचं कारण हेही असू शकतं, हे मात्र या व्यंगचित्रातून कळतं. हे सर्वस्वी नवीनच! यात ते धनाढय़ म्हातारे बॉस आपल्या मित्राला आपल्या तरुण, तगडय़ा पर्सनल पुरुष असिस्टंटविषयी सांगत आहेत. ‘‘तसा तो पर्सनल सेक्रेटरी म्हणून फार काही उपयोगाचा नाही. पण पुढे कधीतरी मला एखादा अवयव  बदलावा लागला तर हा माणूस हाताशी असेल.’’ (आभार : प्ले बॉय)

दहा ते पाच ही नोकरी म्हटलं की बहुतेकांची ‘दहा वाजण्याकडे पूर्ण दुर्लक्ष आणि पाच वाजण्याकडे संपूर्ण लक्ष’ अशी मनोवृत्ती असते. ऑफिस सुटण्याच्या वेळी अचानक कोणतंही महत्त्वाचं काम येऊ नये आणि घरी जायला उशीर होऊ नये अशीच सर्वाची इच्छा असते! अशा वेळी चुकून एखादं काम आलं तर ‘उद्या बघू’ असं म्हणून हे नोकरदार लगेच ऑफिसबाहेर पडू लागतात! ही नोकरदारांची एक जागतिक सवय असावी. कारण चार्ल्स बरसोट्टी या इंग्लंड, अमेरिकेतल्या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराने हे नेमकं हेरलं आहे.

हे चित्र इतकं लोकप्रिय झालं की ब्रिटिश सरकारनं बरसोट्टी यांचा सन्मान म्हणून या व्यंगचित्राचं पोस्टाचं तिकीट काढलं!