‘पडसाद’मधील ‘ते’ लोक जबाबदार’ हे शारंगधर बोडस (१२ मार्च) यांचे पत्र वाचले. लेखकाला स्पष्ट बोलायची भीती वाटत असल्याने त्यांनी ‘ते’ हा शब्दप्रयोग केला असावा बहुतेक. मुळात मुस्लीम अथवा ख्रिश्चन धर्मीय हे आपल्या धार्मिक संस्कृतीबद्दल अतिशय जागरूक आहेत. त्यामुळे त्यांनी जर हिंदी अथवा उर्दूमिश्रित मराठी भाषेचा रोजच्या बोलण्यात वापर केला तर तो त्यांच्या सांस्कृतिक वा धार्मिक जगण्याचा भाग आहे. राहता राहिला मुद्दा बौद्ध, जैन, शीख, भारतीय पारशी आणि भारतीय ज्यू धर्मीयांचा, तर यातील बहुतांश लोक हे कळत-नकळतपणे हिंदू तसेच ब्राह्मणी धर्माच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. त्यांच्यातील बहुतेकांना आपल्या धर्माचा स्वाभिमान तसेच त्यातील मूल्ये, विचारधारा, तसेच धार्मिक संस्कृती यांचा विसर पडल्याने अथवा जागरूकता नसल्याने हिंदू धर्माच्या सांस्कृतिक व धार्मिक अंगाचा पगडा बाळगण्यात यांना जास्त स्वारस्य आहे. त्यामुळे आपसूकच हिंदू धर्मीयांना तौलनिकदृष्टय़ा जवळचे वाटतात व लांबचे वाटतात. आणि मराठी सांस्कृतिक क्षेत्र (मग ते साहित्यिक असो व चित्रपट, नाटय़सृष्टी असो) किती ढोंगी व बुरसटलेले आहे, हे मी वेगळे सांगायची गरज नाही. तेव्हा प्रबोधनाची जास्त गरज ही ‘मराठी’ माध्यमकर्त्यांना आहे. ‘त्यां’ना नाही.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
– अमित अशोक पवार
नको त्या आठवणी
‘लोकरंग’मधील (१२ मार्च) ‘व्रणवर्षांची कटू आठवण’ हा लेख वाचला. हा लेख सहृदय वेदना देणारा आहे. कारण त्या दिवशी आमचे दुपारचे जेवण आयओसीच्या कॅन्टीनमध्ये सुरू होते. अचानक जोराचा आवाज आला, नंतर क्षणार्धात आमच्या आणि समोरच्या इमारतींच्या काचांचा मोठा खच खाली पडला होता. थोडय़ा वेळातच अॅनी बेझंट रस्ता पूर्ण बंद करण्यात आला. जाताना वाटेत अनेक ठिकाणी जखमी झालेल्या लोकांच्या किंकाळ्या आणि काही ठिकाणी शरीराचे अनेक अवयव पडलेले दिसत होते. आजही त्या वेळच्या कटू आठवणींनी मन हेलावून जाते. अशा घटना पुन्हा होऊ नयेत.
सी. एस. मुळेकर
परस्परांच्या श्रद्धा व धर्माचा आदर आवश्यक
मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा बळी घेणाऱ्या ७१३ लोकांना जखमी करणाऱ्या या भयंकर घटनेच्या आठवणीने तीन दशकांनंतर आजही मनात भयाचे आणि संतापाचे थैमान सुरू होते! या भयंकर हाहाकाराचे पीडित व प्रत्यक्षदर्शीचे मन सुन्न करणारे, हृदय पिळवटून टाकणारे अनुभवकथन वाचून अंगावर शहारे आले. या अमानवी कृत्याचा निषेध व्हायलाच हवा, परंतु या घटनेला समाज आणि धर्मदुभंग करणारी असे संबोधणे उचित वाटत नाही. ६ डिसेंबर ९२मधील ‘बाबरी मस्जिद’ पाडण्याची घटनासुद्धा समाज व धर्मदुभंग करणारीच होती. विविध जाती, धर्म, पंथ असलेल्या या आपल्या देशाचा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगात लौकिक आहे. परस्परांच्या श्रद्धा व धर्माचा आदर करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. कवी इकबाल यांनी म्हटलेच आहे- ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना!’
श्रीकांत जाधव, सातारा
मोठी शोकांतिका
‘लोकरंग’ (१२ मार्च) मधील रघुनंदन गोखले यांचा ‘चौसष्ट घरांच्या गोष्टी’ या सदरातील ‘कॅपाब्लांका -बुद्धिबळाचे यंत्र’ हा लेख फार आवडला. या लेखातून नवीन माहिती कळली. क्युबासारखा लहान देश ब्रँड अँबेसिडरसारखी कल्पना त्या काळात अमलात आणतो हे वाचून आश्चर्य आणि कौतुकही वाटले. अनेक प्रतिभावंत, प्रथितयश खेळाडूंना प्रसिद्धी आणि यश पचवता येत नाही, हे वाचून वाईट वाटले. काही प्रसिद्ध खेळाडूंचे वैयक्तिक आयुष्यही फारसे प्रेरणादायी नसते हे जाणवले. त्याचा अंत कसा झाला (वैद्यकीय सल्ला न मानणे) हे वाचून धक्काच बसला. बुद्धी आणि विवेक/शहाणपणा यात फरक आहे, हे जाणवले. अतिशय प्रतिभावान असूनसुद्धा हवे तसे किंवा हव्या त्या प्रमाणात यश मिळाले नाही असे वाटते. अनपेक्षितपणे शेवट व्हावा ही मोठी शोकांतिका!
– प्रसाद भवाळकर