scorecardresearch

Premium

विश्वपुरम

हल्ली माझा गोंधळ उडालाय. माझा बालमित्र चंदू काही दिवसांपूर्वी एका चर्चासत्राला गेला होता. कारण काही नाही. केवळ अनेक वर्षांपासूनची पुण्यनगरी सवय म्हणून. तिथं एक स्थानिक तज्ज्ञ एकविसाव्या शतकाचं अर्थशास्त्र हसत-खेळत मेथडनं समजावून सांगत होते. बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘गंमत म्हणजे २० वर्षांपूर्वी भारताने ‘एलपीजी’चा अंगीकार केला.’’

विश्वपुरम

हल्ली माझा गोंधळ उडालाय. माझा बालमित्र चंदू काही दिवसांपूर्वी एका चर्चासत्राला गेला होता. कारण काही नाही. केवळ अनेक वर्षांपासूनची पुण्यनगरी सवय म्हणून. तिथं एक स्थानिक तज्ज्ञ एकविसाव्या शतकाचं अर्थशास्त्र हसत-खेळत मेथडनं समजावून सांगत होते. बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘गंमत म्हणजे २० वर्षांपूर्वी भारताने ‘एलपीजी’चा अंगीकार केला.’’

चंदूनं उजव्या बाजूच्या शेजारणीला कुजबुजत गमतीचं कारण विचारलं, ‘‘एलपीजी म्हणजे?’’

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

कायमस्वरूपी उंचावलेल्या भुवया अधिकच उंचावत तिनं उत्तर दिलं, ‘‘घरगुती गॅस. बरशेन, भारत गॅस वगरे. नाहीय का तुमच्या घरी?’’

चंदूच्या घरी गॅस सििलडर गेली ४० र्वष असल्यामुळे त्याला हे उत्तर पटलं नाही. म्हणून त्यानं तोच प्रश्न डाव्या बाजूच्या दाढीवाल्याला विचारला. तो म्हणाला, ‘‘शॉर्टफॉर्म आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या तीन शब्दांचा. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण.’’

समोरून तज्ज्ञ निष्कारण दंतपंक्ती पाजळत म्हणाले, ‘‘एलपीजीमुळे भारत आता इतर देशांच्या जवळ आला आहे. जग आता आकुंचन पावले आहे. इतके की, संपूर्ण विश्व आता ‘ग्लोबल व्हिलेज’ झाले आहे. वैश्विक खेडेगाव! जगाचे सपाटीकरण झाले आहे. इंटरनेटमुळे निरनिराळ्या देशांमधले लोक गावातल्या िपपळाच्या पारावर बसल्यासारखे एकाच वेळी एकमेकांशी हितगुज करू शकतात. व्यापार, दळणवळण, करमणूक इत्यादी आदानप्रदान प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण करणारे पूर्वीचे र्निबध आता नष्ट झाले आहेत.’’

 हे सांगून चंदू मला म्हणाला, ‘‘असं जर आहे तर गेल्या महिन्यात आम्ही थायलंडला गेलो होतो तिथं भारतीय रुपये का नाही चालले?’’

मी गोंधळलो. मला खुद्द माझा अनुभव आठवला. यूरेलचा पास काढून मी सपत्नीक युरोपचा दौरा रेलमार्गानं करत होतो. इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर ट्रेनमध्ये तो पास दाखवला. तिकीट चेकर महिला पास आमच्या तोंडावर फेकून गरजली, ‘‘नॉट व्हॅलिड! तिकीट काढा.’’

पत्नीनं आवेशात तो परत तिच्या हातात कोंबून म्हटलं, ‘‘व्हॅलिड कसा नाही? यूरेलचा फर्स्ट क्लासचा पास आहे. वाच डोळे उघडून. अख्ख्या युरोपमध्ये फिरण्याचे पसे टिच्चून भरलेयत आधीच.’’

राणीच्या वतीनं सरकारी तोऱ्यात रिटर्न गिफ्ट आलं, ‘‘हे युरोप नाही. इंग्लंड आहे.’’

युरोप खंडात इंग्लंडची भूमी समाविष्ट होत नाही, ही खळबळजनक बातमी ऐकून आम्हा उभयतांना सातवीच्या भूगोलात नापास झाल्यासारखं वाटलं.

आणखी एक छळवादी उपद्व्याप म्हणजे व्हिसा. वडगावातल्या एका आळीतून दुसऱ्या आळीत जाण्याकरिता सरपंचाची परवानगी घ्यावी लागत नाही. पण विश्वपुरममधल्या एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायचं म्हटलं तर त्या दुसऱ्या गल्लीतल्या सरकारी दादासमोर उभं राहून उलटतपासणीला तोंड द्यावं लागतं : आमच्या देशात का जाणार? किती दिवस राहणार? कशावरून नक्की परत येणार? तिथला खर्च कोण करणार? तुम्हीच खर्च करणार तर तुम्ही पसे कसे मिळवता? आयकर भरता का? गेल्या तीन वर्षांचे आयकर रिटर्न आणलेयत का? एकूण संपत्ती किती? शिक्षण किती? वगरे वगरे. सरकारी दादाचं समाधान झालं तर व्हिसा मिळणार. नाही तर कोणतंही कारण न देता विश्वपुरममधल्या त्या गल्लीत पाऊल टाकण्याचा परवाना नाकारला जातो.

शिवाय या दादाचा एक जुळा भाऊ त्या गल्लीच्या तोंडावर उभा असतो. तो तेच प्रश्न विचारून आपल्या प्रवासाचा शीण वाढवतो. लेकीचं पहिलं बाळंतपण करायला तब्बल २४ तासांचा हवाईप्रवास जन्मात पहिल्यांदाच करून आलेल्या एका भावी आजीला अमेरिकावारीचं ते खरं कारण सांगितल्यामुळे तो अमेरिकेत प्रवेश नाकारतो. कारण काय, तर म्हणे तिच्यामुळे एका अमेरिकन नॅनीला आयाची नोकरी मिळण्यापासून वंचित व्हावं लागलं असतं.

त्याच्या पुढे आणखी एक भाऊ उभा असतो. आपल्या बॅगेतल्या जिरं, धणे, कडधान्यं, फळं इत्यादी गृहोपयोगी चिजा त्याला पसंत पडत नाहीत. आपले नगदी रुपये आणि त्याच्या गल्लीच्या चलनी नोटा आपण खिशात बाळगणं त्याला नामंजूर असतं. याउलट मी तब्बल २५ वर्षांपूर्वी केलेल्या स्वीडनवारीची आठवण अजून ताजी आहे. त्या वेळी नुकतीच स्वीडनसाठी व्हिसाची अट घातली गेली होती. तीसुद्धा खलिस्तानी दहशतवाद्यांना वेसण घालण्याकरिता भारतीय सरकारनं योजलेल्या उपायांमुळे. मी डेन्मार्कच्या कोपनहेगनहून लाँचनं स्वीडनच्या माल्मो बंदरात उतरलो. इतर उतारू बसमध्ये बसले. मी स्वीडिश कस्टम-इमिग्रेशन ऑफिस शोधू लागलो. एका छोटेखानी कार्यालयावर हवी ती पाटी दिसली. मी आत शिरलो. आत फक्त एक माणूस बसला होता. सरकारी अधिकाऱ्यांशी बोलताना अत्यावश्यक असलेल्या नम्रतेनं मी भारतातून आलो असल्याचं सांगून माझा पासपोर्ट त्याच्यासमोर धरला. माझ्यापेक्षा नम्रपणानं तो म्हणाला, ‘‘वेलकम टू स्वीडन!’’

मी स्वीडनचा व्हिसा छापलेलं पान उघडून पासपोर्ट त्याच्या टेबलावर ठेवला. त्यानं तो बंद करून माझ्या हातात दिला आणि परत म्हटलं, ‘‘वेलकम टू स्वीडन! एन्जॉय युवर स्टे हिअर.’’

मी म्हटलं, ‘‘पण तुमचा स्टॅम्प मारा की.’’

‘‘त्याची काय गरज?’’

‘‘जाताना मी स्टॉकहोमहून विमानानं फ्रँकफुर्टला जाणार आहे. विमानतळावरचा तुमचा सहकारी मला नक्की विचारेल की मी मुळात स्वीडनमध्ये आलोच कसा? पुरावा काय?’’

‘‘मग मी काय करू?’’

‘‘इमिग्रेशनचा तारीखवार स्टॅम्प मारा.’’

त्यानं टेबलाखालचा खण उघडला आणि एक पेटी बाहेर काढली. ती उघडून माझ्यासमोर धरत तो म्हणाला, ‘‘यातला कोणता तुम्हाला हवा तो निवडा.’’

मी एकेक शिक्का कागदावर मारून पाहिला. तिसऱ्या सरकारी स्टॅम्पच्या मध्ये रिकामी गोलाकार जागा दिसली. तो शिक्का मारून मधल्या जागेत आजची तारीख घालून सही कर, असं सांगितलं. त्यानं त्याबरहुकूम केलं आणि माझ्याशी हस्तांदोलन करून तो हसतमुखानं म्हणाला, ‘‘वेलकम टू स्वीडन! एन्जॉय युवर स्टे हिअर. कम अगेन.’’       

मला माझ्या गल्लीतून बिनबोभाट दुसऱ्या गल्लीतल्या मित्राच्या घरी गेल्यासारखं वाटलं. ते खरं विश्वपुरम!

चंदू म्हणाला, ‘‘हे तर काहीच नाही. गेल्याच महिन्यात एका इतिहास संशोधकांच्या भाषणात ऐकलं की, फार फार वर्षांपूर्वी िहदुस्थान, चीन, युरोप, इजिप्त, इराण, अरबस्तान, इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये व्यापाराच्या निमित्तानं लोक सर्रास चकरा मारत होते. नो पासपोर्ट. नो व्हिसा. बोल आता.’’ तर चंदूचा आणि माझा गोंधळ असा उडालाय की, हे सगळे अर्थतज्ज्ञ बजावून बजावून सांगताहेत तसं आपलं जग हे आत्ता विश्वपुरम झालंय म्हणजे पूर्वीपेक्षा नक्की काय सोपं झालंय?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बोलगप्पा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lpg liberalisation privatisation and globalisation global village

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×