नरेंद्र मोदी यांचा डावा आणि उजवा हात म्हणून ओळखले जाणारे आनंदीबेन पटेल आणि अमित शहा एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. आनंदीबेन  मोदी यांच्या मंत्रिमंडळात आनंदीबेन या महसूल, नगरविकास आणि आपत्कालीन व्यवस्थापनमंत्री होत्या. आनंदीबेन या समर्पित आणि कठोर प्रशासक म्हणून त्या ओळखल्या जातात. त्या ८० च्या दशकात भाजपमध्ये दाखल झाल्या़  त्यानंतर त्यांचा आलेख चढताच आह़े
आनंदीबेन पटेल यांची उच्च प्रतीची मूल्ये आणि स्वच्छ प्रतिमा यामुळेच त्यांची मोदींच्या वारसदार म्हणून निवड झाली. १९८७ साली शिक्षिका असताना सरदार सरोवरात पडलेल्या दोन मुलींना वाचविण्यासाठी पटेल यांनी सरोवरात उडी घेतली़  तेव्हापासून त्या प्रकाशझोतात आल्या़
आनंदीबेन यांनी प्रा़  मफतभाई पटेल यांच्याशी विवाह केला़  त्यांना मुलगा आणि मुलगी आहेत़  मात्र त्या १९९० पासून कुटुंबापासून वेगळ्या राहात आहेत़