बिहारला विशेष दर्जा न दिल्याबद्दल भाजप आणि जद(यू)ने स्वतंत्र आंदोलने पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपच्या रेल रोको आंदोलनाला नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला, तर नितीशकुमार यांच्या बिहार बंदला आम्ही पाठिंबा देऊ, असे भाजपने स्पष्ट केले आहे.
दोन्ही पक्ष एकाच प्रश्नावर आंदोलन पुकारणार आहेत. त्यामुळे नितीशकुमार यांनी २८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणाऱ्या रेल रोकोला पाठिंबा दिल्यास आम्ही २ मार्च रोजी बिहार बंदला पाठिंबा देऊ, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले आहे.