केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्याकडील सर्व खात्यांचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. मुंडेंकडे ग्रामविकासाबरोबराच पंचायती राज, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता याही खात्यांचा कार्यभार होता़  आता पुढील नियुक्ती होईपर्यंत ही सर्व खाती गडकरी सांभाळणार आहेत़  राष्ट्रपती भवनातून ही माहिती देण्यात आली.