साताऱ्यात महायुतीत बंडाचे वारे
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाच्या वाटय़ाला आलेल्या सातारा मतदारसंघातील उमेदवारीवरुन रिपाइं आणि शिवेसनेच्याही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. दोन्ही पक्षांतील काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. आठवले यांनी रिपाइंच्या मराठा समाज आघाडीचे उपाध्यक्ष संभाजी सकपाळ यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शिवेसनेमध्येही सकपाळ यांच्या उमेदवारीबद्दल फारसा उत्साह नाही. सेनेतही त्याविरोधात बंडाचे वारे वाहू लागले आहे.  लोकसभा निवडणुकीतील तयारीचा आढावा घेण्यासाठी  तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आठवले यांनी रविवारी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोवाविली आहे. त्यात सातारा मतदारसंघातील उमेदवाराच्या विरोधातील नाराजीचे पडसाद उमटणार आहेत.  बाबर-बारणे संघर्षांतून हकालपट्टी
िपपरी : शिवसेनेतील ‘मास्टर माईन्ड’ कार्यकर्ता, विद्यार्थी सेनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सारंग कामतेकर यांची कोणतेही ठोस कारण न देता पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. मावळ लोकसभेच्या िरगणातील उमेदवार श्रीरंग बारणे व खासदार गजानन बाबर यांच्यातील संघर्षांतून ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी विशेषत: ‘मातोश्री’शी जवळीक असलेले कामतेकर स्थानिक राजकारणात खासदार गजानन बाबर यांचे निकटवर्तीय आहेत. खासदार असूनही बाबरांची उमेदवारी कापण्यात आली व श्रीरंग बारणेंची वर्णी लागली. तेव्हा संगनमताने तिकीट विकल्याचा आरोप करत बाबरांनी पक्ष सोडला. त्यानंतर, त्यांच्या अनेक समर्थकांनी पदांचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले. बाबर समर्थक गट मनसेत जाणार की स्वतंत्रपणे िरगणात उतरणार, अशी चर्चा असतानाच बाबर यांच्यासाठी उमेदवारी अर्ज नेण्यात आला. या घडामोडींमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे व टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले. याचे ‘सूत्रधार’ कामतेकर आहेत, असा संशय ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.  

तोगडिया यांचा कार्यक्रम रद्द
परभणी : विश्व िहदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांचा उद्या (रविवारी) होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आचारसंहितेचे कारण देत प्रशासनाने या कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने हा कार्यक्रम रद्द झाला. अक्षदा मंगल कार्यालयात विहिंप पदाधिकाऱ्यांशी डॉ. तोगडिया संवाद साधणार होते. या बरोबरच शहरातील डॉक्टर व नागरिकांची बठक आयोजित केली होती. परंतु आचारसंहितेचे कारण देत पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमास परवानगी नाकारली.

लातूरमध्ये २५ मतदान केंद्रे संवेदनशील
लातूर  : लातूर लोकसभा मतदारसंघातील २५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या केंद्रांमध्ये पूर्वी झालेला गोंधळ, फेरमतदान, बेपत्ता मतदारांची संख्या अधिक असलेले केंद्रही संवेदनशील असल्याचे घोषित करण्यात आले. बेपत्ता मतदार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या कधी दृष्टीस पडले नाहीत अथवा कुटुंबातील मतदारांशी त्यांचा संपर्क नाही, असे २५ हून अधिक मतदार असलेले केंद्र संवेदनशील ठरविण्यात आले. एखाद्या केंद्रात २५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदार छायाचित्रे नसल्यास ते केंद्रही संवेदनशील ठरविण्यात आले आहे. एखाद्या केंद्रात ९० टक्के मतदान होऊन, यात ७५ टक्क्य़ांहून अधिक मतदान एकाच उमेदवारास झाल्यास असे केंद्रही संवेदनशील ठरविण्यात आले आहे. संवेदनशील केंद्राची निश्चिती करताना प्रशासनाला मात्र प्रत्येक केंद्राचा अत्यंत बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे.