धर्मनिरपेक्षतेच्या नावाने मुस्लिम समाजाची मते घ्यायची, मात्र त्यांच्या विकासासाठी काहीच करायचे नाही, समाजवादी पक्षाच्या उमेदवारांमुळे काँग्रेसला फटका बसला तर, त्याचा आम्ही विचार करणार नाही, मुस्लिम मतदार  कुणाची जहागिरी नाही, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्षआमदार अबू आझमी यांनी काँग्रेसवर टीका केली.
समाजवादी पक्ष राज्यातील लोकसभेच्या २२ ते २५ जागा लढविणार आहे. त्यापैकी १३ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आझमी  भिवंडी, धुळे किंवा मुंबईतून निवडणूक लढविणार आहेत. समाजवादी पक्षाचे मुंबईतील चार मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले. मुस्लिम व उत्तर भारतीय बहुल मतदारसंघातील सपच्या उमेदवारांमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. भाजप-शिवसेना  क्रमांक एकचा शत्रू आहे, काँग्रेस मुस्लिमांचा मतांसाठी वापर करीत आहे, असा आरोप आझमी यांनी केला.

उमेदवार
उत्तर पश्चिम मुंबई-कमाल खान
दक्षिण-मध्य मुंबई-काशिनाथ पाशी,उत्तर मुंबई-कमलेश यादव
इशान्य मुंबई-रईज खान
वर्धा-डॉ. अंकूश नवले
अहमदनगर-राजेंद्र पवार
यवतमाळ-वाशिम-परवेझ सिद्दिकी,गडचिरोली-चिमूर-विनोद ननावरे,जालना-कुंजबिहारी अग्रवाल,भंडारा-गोंदिया-रामेश्वर ठाकरे, बीड-अ‍ॅड. माणिकराव बावनेनांदेड-बाळासाहेब मोरे
रामटेक-मायाताई चौरे