मतांचे राजकारण करण्याच्या मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना रक्ताने हात माखलेल्यांनी देशाबद्दलच बोलूच नये असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
बंगालमधील उत्तर दिनापूर जिल्ह्यात निवडणूक प्रचारसभेत बोलत असताना ममता म्हणाल्या की, “रक्ताने हात माखलेल्यांना देशाबद्दल बोलणे शोभत नाही. गुजरात राज्याला दंगलींची पार्श्वभूमी आहे आणि जनता दंगली सारख्या घटनांना पाठिंबा देत नाही.” तसेच “मी संपूर्ण आयुष्य जनतेसाठी बहाल करण्यासाठी तयार आहे परंतु, हिंदू आणि मुस्लिम यांचे विभाजन होण्याला माझा पाठिंबा नाही. तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वधर्मांना समानतेच्या दृष्टिकोनातून पाहणारा पक्ष आहे.” असेही ममता पुढे म्हणाल्या.