बसपच्या उमेदवार शोधमोहिमेत माजी मंत्री भांडे गळाला

पक्ष बांधणीसाठी पाच वर्षे कार्यकर्त्यांनी राबायचे आणि निवडणुकीत उमेदवारी मात्र दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांला किंवा पक्षाशी काही संबंध

पक्ष बांधणीसाठी पाच वर्षे कार्यकर्त्यांनी राबायचे आणि निवडणुकीत उमेदवारी मात्र दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांला किंवा पक्षाशी काही संबंध नसणाऱ्यांना द्यायची ही परंपरा बसपने या वेळीही कायम राखली आहे. अशाच प्रकारे लोकसभा निवडणुकीतील बसपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत भारिप-बहुजन महासंघातून बाहेर पडलेले माजी मंत्री दशरथ भांडे यांचा समावेश आहे. गेल्या आठवडय़ात ब्पहिली यादी जाहीर केली. त्यात चाटे क्लासवाले मच्छिंद्र चाटे यांचा समावेश होता. दर निवडणुकीत ऐनवेळी असे बाहेरचे उमेदवार येतात, बसपच्या नावाने निवडणुका लढतात, हारतात आणि पक्ष सोडून जातात.
बसपचे उमेदवार
रावेर-दशरथ भांडे,दिंडोरी-शरद माळी
नागपूर-मोहन गायकवाड, रामटेक-श्रीमती किरण पाटणकर,भंडारा-संजय नासरे अमरावती-रविंद्र वैद्य, कल्याण-शफाकत अली सिद्दिकी,पालघर-प्रकाश सावर, पुणे-इम्तियाज पिरजादे,शिरुर-सर्जेराव गायकवाड,सोलापूर-संजीव सदाफुले, सातारा-प्रशांत चव्हाण,रत्नागिरी-राजेंद्र आयरे,जालना-शरदश्चंद्र वानखेडे, परभणी-गुलमीरखान,उस्मानाबाद-पद्मशील ढाले,हातकणंगले-संग्रामसिंग गायकवाड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bsp best option for candidates come from other party

ताज्या बातम्या