लोकसभा निवडणूक २०१४ साठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी उमेदवारी मिळालेल्या नवनीत कौर-राणा यांच्यावर मुलूंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांना लोकसभा उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, मागावर्गीय जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर निर्माण झालेल्या वादावर न्यायालयाने नवनीत राणा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर नवनीत राणा यांच्यावर कलम ४२०,४६८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे. प्रमाणपत्राची वैधता रद्द झाल्यास, नवनीत राणांची उमेदवारीही आपोआप रद्द होईल