लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी मान्य केले आहे. विविध प्रश्नांबाबत मीडियाशी संवाद साधण्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अयशस्वी ठरले असल्याची टीकाही चाको यांनी केली आहे.निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या काँग्रेससाठी भाकीत न वर्तविता येण्यासारखी स्थिती आहे, सध्या पक्षाची स्थिती गंभीर आहे. पंतप्रधान डॉ. सिंग हे व्यवस्थापनातील तज्ज्ञ आहेत, मात्र संपर्काचा अभाव आहे, त्यांनी मीडियाशी सातत्याने संपर्क ठेवला नाही, असेही चाको म्हणाले.