गुजरातमध्ये जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. आता याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेतेच निर्णय घेतील. याबाबत काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रसचे प्रफुल्ल पटेल चर्चा करणार आहेत.
चर्चेतून जर मार्ग निघाला नाही तर आम्ही सर्व २६ जागी उमेदवार उभे करू, असा इशारा गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पटेल यांनी दिला आहे. आताच आम्ही याबाबत काही बोलणार नाही. आम्ही त्यांना तीन जागा दिल्या आहेत तसेच पोरबंदरची जागा देऊ केली आहे, असे काँग्रेस नेते शक्तीसिंह गोहिल यांनी स्पष्ट केले. आता आम्ही राष्ट्रवादीकडून उत्तराची वाट पाहत आहोत, असे गोहिल यांनी स्पष्ट केले.