राज्यात मतदारांच्या संख्येत सुमारे २० लाख मतदार असलेला ठाणे हा सर्वात मोठा मतदारसंघ असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे १३.५० लाख मतदार आहेत. मतदार नोंदणीत सर्वाधिक नोंदणी आणि नावे ठाणे जिल्ह्यातच वगळण्यात आली आहेत.
मतदार नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. मुंबईत २५ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. विदर्भात १२ मार्च तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात १६ मार्चपर्यंत नावे नोंदविता येऊ शकतात, असे राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गद्रे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राज्यातील ८९,४७९ मतदान केंद्रांवर येत्या रविवारी मतदार याद्यांमध्ये नाव आहे की नाही याची खात्री मतदारांना करता येणार आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबविम्यात आलेल्या मोहिमेत राज्यात सुमारे ५० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. तर आतापर्यंत सुमारे ४० लाख मतदारांची नोंदणी झाली आहे.
अजूनही मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सर्वाधिक सुमारे २० लाख मतदार ठाणे लोकसभा मतदारसंघात आहेत. मावळ आणि कल्याण सुमारे १९ लाख, नागपूर (१८.५० लाख) तर पुण्यात सुमारे १८ लाख मतदार आहेत.
मतदारसंघनिहाय मतदार संख्या :
*नंदुरबार (१६ लाख, ४५ हजार) *धुळे (१६ लाख, ४३ हजार) *जळगाव (१६ लाख, ५९ हजार) * रावेर (१५ लाख, ६१ हजार)
* बुलढाणा (१५ लाख, ६८ हजार) * अकोला (१६ लाख, ४० लाख) * अमरावती (१५ लाख, ६७ हजार) * वर्धा (१५ लाख, ४१ हजार) * रामटेक (१६ लाख, ४३ हजार) * नागपूर (१८ लाख, ५० हजार) * भंडारा-गोंदिया (१६ लाख, ३० हजार) * गडचिरोली (१४ लाख, ५० हजार) * चंद्रपूर (१७ लाख, ४१ हजार) * यवतमाळ-वाशिम (१७ लाख, १४ हजार) * हिंगोली (१५ लाख, ६४ हजार) *नांदेड (१६ लाख, ६१ हजार) *परभणी (१७ लाख, ६५ हजार) * जालना (१५ लाख, ८० हजार) *औरंगाबाद (१५ लाख, ३० हजार) * दिंडोरी (१५ लाख)* नाशिक (१५ लाख, ४५ हजार) * पालघर (१५ लाख, ४७ हजार) * भिवंडी (१६ लाख, ४१ हजार) * कल्याण (१९ लाख) * ठाणे (२० लाख) * उत्तर मुंबई (१७ लाख, २५ हजार) * उत्तर-पश्चिम मुंबई (१७ लाख, २६ हजार) * ईशान्य मुंबई (१६ लाख, २९ हजार) * उत्तर-मध्य मुंबई (१७ लाख) * दक्षिण-मध्य मुंबई (१४ लाख, १० हजार) *दक्षिण मुंबई (१४ लाख,३७ हजार) * रायगड (१५ लाख, १३ हजार) * मावळ (१९ लाख), * पुणे (१७ लाख, ७५ हजार), * बारामती (१७ लाख, ५८ हजार),    *शिरुर (१७ लाख, ६२ हजार),   * नगर (१६ लाख, ७२ हजार),   * शिर्डी (१४ लाख, ४७ हजार), * बीड (१७ लाख, ६९ हजार), * उस्मानाबाद (१७ लाख, ०७ हजार), * लातूर (१६ लाख, ६८ हजार), * सोलापूर (१६ लाख, ६४ हजार), * माढा (१७ लाख), * सांगली (१६ लाख, ०६ हजार), * सातारा (१६ लाख, ९२ हजार), * रत्नागिरी-सिंधुदुर्ग (१३ लाख, ४७ हजार), * कोल्हापूर (१७ लाख, २२ हजार), * हातकणंगले (१६ लाख, १० हजार).
नव्याने नोंदणी झालेले मतदार :
ठाणे जिल्हा ( पाच लाख), मुंबई उपनगर (३ लाख, २५ हजार), पुणे (३ लाख, २० हजार), नगर (१ लाख, ९४ हजार), रायगड (दीड लाख), सोलापूर (१ लाख, ४० हजार), कोल्हापूर (एक लाख).