News Flash

शेतकऱ्यांना लखपती करणारा ‘वैजनाथ’!

वर्षांपासून या गटांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न पाच कोटींच्या घरात गेले आहे.

   गटशेतीच्या माध्यमातून वैजनाथ कराड यांनी विविध पिकांचे उत्पादन घेत शेतकऱ्यांच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. (चौकटीत वैजनाथ कराड) 

पश्चिम महाराष्ट्रातील पाच एकराचा शेतकरीही सधन असतो. आपल्याकडे पन्नास एकरचा मालकही कर्जबाजारी असतो. ही प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी शेती वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बांधून, घरच्यांचा प्रचंड विरोध झुगारून वैजनाथने शेती करण्यास सुरुवात केली.  शेतकऱ्यांचा गट करत त्यांना बाजारपेठ मिळवून देत वैजनाथने गट शेतीतून परळी, माजलगाव परिसरात तीस ते पस्तीस गट तयार करून जवळपास एक हजार शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत बदलून टाकली. वर्षांपासून या गटांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न पाच कोटींच्या घरात गेले आहे.

वीस वर्षांपूर्वी गावातील बहुतांश मुले शिकून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपडत असल्याने सुभाषराव कराड यांनीही आपल्या मुलांना शेती सोडून काहीही करा, असा सल्ला दिला होता. मात्र, बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या वैजनाथच्या मनात शेतीच करण्याचा विचार पक्का झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील पाच एकराचा शेतकरीही सधन असतो. आपल्याकडे पन्नास एकरचा मालकही कर्जबाजारी असतो. ही प्रतिकूल परिस्थिती बदलण्यासाठी शेती वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बांधून, घरच्यांचा प्रचंड विरोध झुगारून वैजनाथने शेती करण्यास सुरुवात केली. घरी वडिलोपार्जति २० एकर शेती असली तरी शेती करण्यासाठी मात्र पसे नसल्याने संघर्ष सुरू झाला. बाजाराचा अंदाज घेऊन सुरुवातीला कमी पशातील ‘देवडांगर’ लावून ५० हजार रुपयांचे भांडवल तयार केले. गंगेतील टरबुजावर प्रयोग करून अनेक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवून दिल्याने ‘टरबूज मॅन’ अशी ओळख निर्माण झाली. शेतकऱ्यांचा गट करत त्यांना बाजारपेठ मिळवून देत वैजनाथने गट शेतीतून परळी, माजलगाव परिसरात ३० ते ३५ गट तयार करून जवळपास एक हजार शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत बदलून टाकली. वर्षांपासून या गटांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न पाच कोटींच्या घरात गेले आहे. गट शेतीमुळे उत्पादन खर्च कमी आणि बांधावरच बाजारपेठ आल्याने वाहतूक खर्च वाचला आणि विषमुक्त उत्पादनामुळे परळीच्या भेंडीला जर्मनी, दुबई, लंडन येथून मागणी आली.

परळी तालुक्यातील वाका हे तीनशे उंबऱ्याचे गाव. बहुतांश पारंपरिक शेती हाच व्यवसाय असला तरी घराघरातून मुलांनी शिकावं आणि सरकारी नोकरी मिळवावी याच विचाराची पेरणी झाली. या गावातील सुभाषराव कराड यांनाही २० एकर वडिलोपार्जति शेती असली तरी त्यांनीही आपल्या दोन्ही मुलांना शेती सोडून काहीही करावे, असाच सल्ला दिला. पण सुभाषराव यांचा मुलगा वैजनाथला लहानपणापासूनच शेतीचा छंद. घरची परिस्थिती हलाखीची, वडील कर्जबाजारी. पण काळ्या मातीत रमलेल्या वैजनाथचे शाळेच्या अभ्यासात फारसे लक्ष नव्हते. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण मोह्यत घेऊन महाविद्यालयासाठी तो परळीत आला. बारावीची परीक्षा झाल्यानंतर घरच्यांचा विरोध झुगारून त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि शेतीच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यातून २००७ मध्ये सुरुवातीला त्यांनी २० शेतकऱ्यांचा एक गट तयार केला. १ मे २००७ रोजी वैद्यनाथ कृषी विकास मंचची स्थापना करून या संस्थेद्वारे गटाचे कामकाज सुरू केले. २० शेतकऱ्यांपकी १६ शेतकऱ्यांनीच गटात सहभाग (प्रत्येकी एक एकर) घेतला. समूहात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकत्रित बियाणे, कीटकनाशके आणि यंत्रसामग्रीचा खर्च करण्यात आला. यामुळे उत्पादन खर्च वाचला. या १६ शेतकऱ्यांनी भेंडीचे पीक घेतले. अवघ्या ५० दिवसांमध्ये भेंडीचा तोडा आला, पण मार्केटिंगचे काय, हा प्रश्न वैजनाथ यांनी आधीच सोडविला होता.

कृषी विभागाच्या माध्यमातून ‘अ‍ॅपेडा’ या संस्थेशी संपर्क केला. या संस्थेने भेंडीची गुणवत्ता तपासून तिच्या बाजाराची वाट मोकळी करून दिली. कसल्याही घातक कीटकनाशकांचा फवारा केला नसल्यामुळे भेंडीचे उत्पादन हे विषमुक्त झाले. के. बी. एक्स्पर्ट या कंपनीच्या माध्यमातून परळीची भेंडी परदेशात पोहोचली. २००७ मध्ये बाजारात भेंडीचे भाव १० रुपये किलो असतानाही ‘वैद्यनाथ’ च्या भेंडीला २० रुपयांचा भाव मिळाला. तसा करारच के. बी. एक्सपर्ट कंपनीकडून करून घेण्यात आला. उत्पादन खर्च वाचला, वाहतूक खर्च वाचला आणि उत्पन्न एकरी १ लाख ८० हजारापर्यंत गेले. त्या तुलनेत प्रतिएकर खर्च ४५ ते ५० हजार रुपये आला. खर्च वजाजाता साधारणत: १ लाख १० हजार रुपये निव्वळ नफा झाला. याबरोबरच शेतकऱ्यांना प्रतवारी आणि पॅकिंग करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. सोळा शेतकऱ्यांचे उत्पादन पाहून इतर शेतकरीही गटाकडे आकर्षति झाले.

दुसऱ्याच वर्षी गटातील शेतकऱ्यांची संख्या १६ वरून ७० पर्यंत गेली. जवळपास ८० एकर क्षेत्र गटात सामील झाले. त्यापकी २० एकरात मिरची पिकाची लागवड करण्यात आली. मिरचीला २५ रुपये किलोप्रमाणे हमीभाव मिळाला. प्रतिएकर १०० ते १५० िक्वटल उत्पादन मिळू शकले. मिरचीचे सव्वा कोटी रुपयांचे उत्पादन झाले तर भेंडीचे वेगळे वैद्यनाथ कृषी विकास मंचने दरवर्षी जुन्या पिकांबरोबरच नवेनवे पीक घेण्यास सुरुवात केली. तिसऱ्या वर्षी वांगी गावात गट स्थापन करून २० एकर क्षेत्रात कारले भाजीचे उत्पादन घेतले. कारल्यासाठी पुणे, मुंबई येथे गटाच्या माध्यमातून मार्केटिंग केले गेले. कारल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येकी एक ते दीड लाख रुपयांचा नफा झाला. भेंडी, मिरची, कारल्याबरोबरच दुधी भोपळ्याचेही उत्पादन समूह पद्धतीनेच घेतले. हैदराबाद, मुंबई, दुबई येथे सांबर तयार करण्यासाठी आणि औषधींसाठी दुधी भोपळ्याला मागणी आहे. या सर्व भाज्या विषमुक्त पद्धतीने उत्पादित केल्या गेल्यामुळे त्यांना प्रचंड मागणी आहे. आज परळी आणि माजलगाव तालुक्यात वैद्यनाथ कृषी विकास मंचचे ३० ते ३५ गट आहेत. या गटांमध्ये जवळपास एक हजार शेतकरी सहभागी आहेत. तर चार ते पाच हजार एकर क्षेत्र गटामध्ये सहभागी आहे. सर्व गटांचे वार्षकि उत्पन्न पाच कोटींच्या घरात गेले. हे सव वैद्यनाथ कृषी विकास मंचचे मुख्य प्रवर्तक वैजनाथ कराड यांच्यामुळे होऊ  शकले. या त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज भेंडी, मिरची, कारले, दुधी भोपळा, टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याची पिके गटशेतीच्या माध्यमातून घेतली जात आहेत.

संस्थेचे कार्य

वैद्यनाथ कृषी मंचच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दर महिन्याला कार्यशाळेचे आयोजन केले जाते, मार्केटिंगची माहिती दिली जाते, प्रतवारी आणि पॅकेजिंगची कार्यशाळा घेतली जाते. सर्व शेतकऱ्यांसाठी एकत्रित बियाणे, कीटकनाशके आणि यंत्रसामग्रीचा खर्च केला जातो. गटाकडे फवारणी यंत्र, ट्रॅक्टर, भरड धान्याचे युनिट आदी यंत्रसामग्री आहे. त्यामुळे मागेल त्याला अल्पदरात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रत्येक आठवडय़ाला शेतकऱ्यांचे पेमेंट केले जाते. याबरोबरच नर्सरी उभी करण्यात आली असून शेतकऱ्यांना विविध भाजीपाल्यांची रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत. दशपर्णी अर्क, जीवामृत आदी नसíगक पद्धतीने तयार केलेली कीटकनाशके उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस आणि प्रोसेसिंग युनिट तयार करण्याचा मानस कराड यांनी बोलून दाखविला.

सहभागी गावे 

वैद्यनाथ कृषी विकास मंचला परळी आणि माजलगाव तालुक्यातील १८ ते २० गावांतून एक हजार शेतकरी आणि पाच हजार एकर क्षेत्र सहभागी झालेले आहे. यामध्ये बोधेगाव, कावळ्याची वाडी, नागिपपरी, अस्वलअंबा, नागापूर, वांगी, साळेगाव, पटंगी तांडा, पट्टीतांडा, जीवनापूर तांडा, सिरसाळा, पोहनेर, औरंगपूर, वाका, घनाळ तांडा, तेलसमुख, हिवरा, वाघाळा आदी गावांचा सहभाग आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यतील अनेक गावे संस्थेला जोडली जाऊ लागली आहेत.

vasantmunde@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2016 12:54 am

Web Title: success story of farmer
Next Stories
1 ‘नॉलेज सेंटर’चा मळा फुलतोय
2 नाचणीलाही ‘टिश्यूकल्चर’ची साथ
3 पेरणी : खरीप कडधान्ये
Just Now!
X