* पांढरी माशी व लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने दक्षिण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* यंदाचा हंगाम वेळेवर सुरू होणार असल्याने साखर उद्योग सुखावला असला तरी ऊस उत्पादकांपुढे या किडीचा सामना करण्याचे मोठे आव्हान आहे.

* कोल्हापूर आणि सांगलीतील संपूर्ण ऊस पट्टय़ात लोकरी मावा व पांढऱ्या माशीने थैमान घातले आहे. दोन्ही जिल्ह्य़ांतील प्रत्येक ऊस क्षेत्रावरील दहा टक्के क्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव आहे.

* त्यामुळे या भागातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

* मागील महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण महाराष्ट्रातील ऊस पीक संकटात सापडले आहे.

* राज्यात १ नोव्हेंबरपासून ज्वारी, मका खरेदी’

* राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या ज्वारी आणि मका उत्पादनाला चांगला भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने पणनच्या माध्यमातून १ नोव्हेंबरपासून ज्वारी व मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

* कांद्याला जादा भाव देण्यासाठी शासनाकडून येत्या पाच वर्षांत सुमारे १५ लाख चाळी उभारण्यात येतील. तसेच, कापसालाही भाव देण्यात येईल, असे आश्वासनही खोत यांनी दिले.

* जलयुक्त शिवारच्या योजनेमुळेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविणे शक्य झाले आहे, असेही खोत म्हणाले.

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture news
First published on: 27-10-2016 at 05:24 IST