Bhaubeej 2023 Gift Ideas for Brothers and Sisters: दिवाळीतील भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची महती गाणारा सण म्हणजे भाऊबीज. भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. भाऊ आणि बहीण हे एकमेकांचे पहिले मित्र आहेत. ते अनेकदा भांडत असले तरी कठीण प्रसंगी एकमेकांसोबत असतात. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वितिया तिथिला ‘भाऊबीज’ सण साजरा केला जातो. यंदा १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल. दिवाळीच्यावेळी भाऊबीजेला सर्वाधिक भेटवस्तू दिल्या जातात, या भाऊबीजेला भावासाठी काय भेटवस्तू खरेदी करावी, हा प्रश्न बहिणींना पडत असतो. पण काळजी करु नका, आज आम्ही तुमच्यासाठी स्वस्त आणि मस्त असे हटके पर्याय घेऊन आले आहोत. या भेटवस्तूंमुळे भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा अधिक वाढणार आहे. पाहा खालील पर्याय…

भाऊबीजेला भावाला द्या ‘हे’ नेहमीपेक्षा वेगळं गिफ्ट

१. मोबाईल फोन

मुलांना स्मार्टफोनचे प्रचंड वेड असते. तुमच्याही भावाला अशी आवड असेल तर तुम्ही आपल्या भावालाही नवीन मोबाईल फोन गिफ्ट करू शकता.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
keratin hair treatment can cause kidney issues
किडनी खराब करु शकते केसांची केराटिन ट्रिटमेंट? डॉक्टरांनी सांगितला धोका, कशी घ्याल काळजी
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

२. शर्ट आणि टी-शर्ट

यंदाच्या भाऊबीजेला तुम्ही तुमच्या भावाला छान शर्ट किंवा टी-शर्ट खरेदी करुन भेट देऊ शकता. स्वस्तात मस्त शर्ट किंवा टी-शर्ट बाजारात उपलब्ध आहेत.

३. स्मार्ट वॉच

बाजारात अनेक कंपन्याच्या डिस्काउंटसहीत स्मार्ट वॉच उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या भावाला एक छानशी स्मार्ट वॉच भेट देऊ शकता.

(हे ही वाचा : १५ नोव्हेंबरच्या दिवशी भाऊबीजेला फक्त दोन तासांचा शुभ मुहूर्त! ‘या’ वेळात भावाला ओवाळून करा दीर्घायुष्याची प्रार्थना )

४. जुन्या फोटोंचा कोलाज

भाऊबीजेला पैसे किंवा कपडे द्याचये नसतील तर तुम्ही बालपणीच्या जुन्या आठवणी ताज्या करु शकता. या निमित्ताने तुम्ही तुमच्या भावाला बालपणीच्या फोटोंचा मोठा कोलाज करुन भावाला भेट देऊ शकता.

५. जिम मेंबरशिप

तुमच्या भावाच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या भावाला जिम मेंबरशिप देऊ शकता. ही भेट त्याला नक्की आवडू शकते.

६. इअरबड्स

तुमच्या भावाला गाणं ऐकायची आवड असेल तर यंदाच्या भाऊबीजेला तुम्ही भावाला एखाद्या कंपनीचे इअरबड्सही भेट देऊ शकता.

७. हेअर स्ट्रेटनर

केस स्टायलिश बनविण्यासाठी तुम्ही तुमच्या भावाला स्वस्तात मस्त असे मिळणारे हेअर स्ट्रेटनरही भेट म्हणून देऊ शकता.

पाहा आणि सांगा तुम्हाला वरिलपैकी कोणते पर्याय आवडले…